Tanning : टॅनिंग कमी करण्यासाठी घरी बनवता येईल स्क्रब, कोरडी त्वचा होईल मुलायम 

Last Updated:

हात पाय आणि चेहरा टॅन होत असेल तर खोबरेल तेलाचा वापर करा. यामध्ये कॉफी पावडर मिसळून लावण्यानं, 5 दिवसात चेहऱ्यावरचा टॅन पूर्णपणे निघून जाईल. टॅनिंगमुळे त्वचेचा रंग बदलतो. यासाठी हा उपाय करुन बघा.

टॅनिंग
टॅनिंग
मुंबई : त्वचा टॅन होऊन रंग बदलला असेल तर त्यासाठी तुम्ही घरी स्क्रब बनवू शकता. हात, पाय आणि चेहरा टॅन होत असेल तर खोबरेल तेलाचा वापर करा. यामध्ये कॉफी पावडर मिसळून लावण्यानं, 5 दिवसात चेहऱ्यावरचा टॅन पूर्णपणे निघून जाईल. टॅनिंगमुळे त्वचेचा रंग बदलतो. यासाठी हा उपाय करुन बघा.
सूर्यप्रकाश, धूळ, प्रदूषण आणि निष्काळजीपणामुळे त्वचा कोरडी आणि निर्जीव होते. विशेषत: हिवाळा आणि उन्हाळ्याच्या काळात त्वचा टॅन होते, ज्यामुळे त्वचेचा रंग बदलतो. उन्हात जास्त वेळ राहल्यानं हा परिणाम जाणवतो. टॅनिंग कमी करण्यासाठी बाजारात अनेक प्रकारची उत्पादनं उपलब्ध असली तरी ती नैसर्गिक नसतात आणि दीर्घकाळासाठी प्रभावी नसतात. त्यामुळे ही उत्पादनं वापरण्याऐवजी नैसर्गिक आणि हर्बल पद्धतीनं घरच्या घरी टॅनिंगवर उपाय करता येतो.
advertisement
सूर्याची हानिकारक किरणं शरीरावर पडतात तेव्हा शरीरात मेलेनिनचं प्रमाण वाढतं आणि त्वचेवर पिगमेंटेशन दिसू लागतं. मेलॅनिन वाढलं की शरीराची त्वचा काळी पडते. सूर्यप्रकाश जितका जास्त शरीरावर पडेल तितकं जास्त मेलॅनिन तयार होतं आणि त्वचेचा रंग गडद होतो. जे लोक जास्त वेळ उन्हात काम करतात किंवा भरपूर सन बाथ करतात, त्यांची त्वचा काळी पडते. टॅनिंगमुळे, त्वचेवर रंगद्रव्य अधिक दिसू लागतं आणि त्वचेवर अकाली डाग, सुरकुत्या आणि चट्टे दिसतात. टॅनिंग टाळण्यासाठी, उन्हात जाताना छत्री, गॉगल वापरा आणि त्वचेवर सनस्क्रीन क्रिम वापरा.
advertisement
खोबरेल तेलात कॉफी पावडर मिसळून स्क्रब बनवू शकता. टॅनिंग दूर करण्यासाठी खोबरेल तेल हा एक चांगला पर्याय आहे. खोबरेल तेलात कॉफी पावडर मिसळून स्क्रब बनवून हाता-पायांवर लावल्यास टॅनिंग कमी होतं. मृत त्वचा स्वच्छ करणारे अँटीऑक्सिडंट्स कॉफीमध्ये आढळतात. यामुळे मृत पेशी निघून जातात पण त्वचा चमकदार आणि मुलायम बनते. नारळाच्या तेलात दाहक-विरोधी गुणधर्म आहेत ज्यामुळे त्वचेवर आलेली सूज आणि लालसरपणा कमी होतो. यामुळे त्वचा मॉइश्चरायझ राहते आणि त्वचेचा मूळ रंग दिसण्यास मदत होते.
advertisement
खोबरेल तेल आणि कॉफी पावडर स्क्रब तयार करण्याची पद्धत
एका भांड्यात एक चमचा खोबरेल तेल घ्या. त्यात दोन चमचे कॉफी पावडर टाकून नीट मिक्स करा. टॅन झालेल्या त्वचेवर नीट लावा. काही वेळ असंच राहू द्या आणि नंतर 10 ते 15 मिनिटं हातानं मसाज करा. आठवड्यातून किमान दोनदा ही प्रक्रिया करा, यामुळे तुमच्या त्वचेवरील टॅनिंग कमी होईल.
advertisement
टॅनिंग दूर करण्यासाठी,
- तुम्ही हळद आणि बेसनचा पॅक देखील लावू शकता. हळदीतील दाहक-विरोधी गुणधर्म टॅनिंग लवकर दूर करतात आणि बेसनामुळे त्वचेचा हरवलेला रंग परत येतो.
- याशिवाय कॉफी पावडर आणि ऑलिव्ह ऑईलचं मिश्रण त्वचेवर लावल्यानंही टॅनिंग कमी होतं.
-लिंबू आणि मध मिसळून तुम्ही नैसर्गिक स्क्रब देखील बनवू शकता, ज्यामुळे त्वचा चमकदार होईल.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Tanning : टॅनिंग कमी करण्यासाठी घरी बनवता येईल स्क्रब, कोरडी त्वचा होईल मुलायम 
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement