पहिली पायरी - चेहरा स्वच्छ करा -
सर्व प्रथम, तुमच्या चेहऱ्यानुसार चांगलं क्लिन्जर किंवा दूध वापरा. चेहरा ओला करा आणि क्लिंजर चेहऱ्यावर
हलक्या हातानं पसरवा. त्यानंतर 2-3 मिनिटं मसाज करून थंड पाण्यानं धुवा.
advertisement
दुसरी पायरी - स्क्रबिंग - एक्सफोलिएटिंग
स्क्रबिंगसाठी, आपल्याला 1 चमचा साखर, 1 चमचा मध आणि 1 चमचा लिंबाचा रस आवश्यक आहे.
या सर्व गोष्टी नीट मिसळा. हे मिश्रण चेहऱ्यावर लावा आणि वर्तुळाकार गतीनं मसाज करा. त्यानंतर 5 ते 7 मिनिटांनी पाण्यानं धुवा. यामुळे त्वचेतल्या मृत पेशी काढून टाकण्यास मदत होईल.
तिसरी पायरी - वाफ घ्या
एका भांड्यात पाणी उकळून त्याची वाफ घ्या. आता 5-10 मिनिटे मसाज करा. यामुळे चेहऱ्यावरची
छिद्रं उघडतील आणि त्वचा सुधारेल.
चौथी पायरी - फेस पॅक
यासाठी तुम्हाला २ चमचे दही आणि १ चमचा हळद लागेल. या सर्व गोष्टी नीट मिसळा. नंतर चेहऱ्यावर लावा आणि १५-२० मिनिटांनंतर चेहरा थंड पाण्यानं धुवा. यामुळे त्वचा मुलायम आणि चमकदार होईल.
पाचवी पायरी - मॉइश्चरारायझिंग
मॉइश्चरायझर किंवा ऑलिव्ह ऑइल घ्या आणि चेहऱ्याला लावा. यामुळे त्वचा हायड्रेटेड आणि मुलायम राहील.
एक महत्त्वाची टीप - फेशियल करण्यापूर्वी चेहरा पूर्णपणे स्वच्छ करा. तुम्हाला जर तुमच्या त्वचेवर कोणत्याही उत्पादनाची ऍलर्जी असेल तर ते उत्पादन वापरू नका.