वैज्ञानिक आणि वैद्यकीय संशोधन प्रकाशित करणाऱ्या वेबसाइट सायन्स डायरेक्टनुसार, प्राचीन भारतीय आयुर्वेद, युनानी आणि रोमन औषधांमध्ये इ.स.पूर्व चौथ्या शतकापासून ब्राँकायटिससारख्या श्वसन रोगांवर उपचार करण्यासाठी याचा वापर केला जात आहे. दमा, बद्धकोष्ठता, सर्दी-खोकला, दात-हिरड्यांचे आजार, मूत्रपिंडाशी संबंधित समस्या, फुफ्फुसांमध्ये कडकपणा किंवा टीबी, डोळ्यांची जळजळ आणि इतर समस्यांवर उपचार करण्यासाठी वेलचीचा वापर केला जातो.
advertisement
Dehydration : डिहायड्रेशन टाळण्यासाठी काय करायचं, ऐका तज्ज्ञांचा सल्ला
आयुर्वेदात, वेलचीला त्रिदोषनाशक मानलं जातं, वात, पित्त आणि कफ संतुलित करण्यासाठी याचा उपयोग होतो.
पचनशक्ती मजबूत करण्यासोबतच मनाला शांत करणं तसंच हृदयाच्या आरोग्यासाठीही वेलची फायदेशीर आहे. वेलचीचं वैज्ञानिक नाव एलेटेरिया कार्डमम आहे, ज्यामधे व्हिटॅमिन सी, मॅग्नेशियम, कॅल्शियम, अँटीऑक्सिडंट्स आढळतात. यामुळे मौखिक आरोग्यही चांगलं राहतं.
जेवणानंतर वेलची चावल्यानं किंवा वेलची पावडर सैंधव मीठ आणि साखरेसोबत घेतल्यानं वात, अपचन आणि आम्लपित्त यापासून आराम मिळतो. दररोज सकाळी वेलची चावल्यानं किंवा ते टाकून, त्याच्या पाण्यानं गुळण्या केल्यानं मुख दुर्गंधी आणि संसर्ग कमी होतो. इतकंच नाही तर गरम दुधात वेलची पावडर मिसळून प्यायल्यानं मानसिक ताण कमी होतो आणि झोपही चांगली येते.
Monsoon Care : पावसाळ्यात घ्या पोटाची काळजी, काय आहे आयुर्वेदिक तज्ज्ञांचं मत ?
रोज सकाळी रिकाम्या पोटी पाण्यासोबत एक वेलची घेतल्यानं रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहतं.
कोमट पाण्यात वेलची पावडर मिसळून प्यायल्यानं रक्तातील साखर नियंत्रित होते आणि चयापचय सुधारण्यासाठी मदत होते.
बडीशेप आणि गुळासोबत वेलची खाल्ल्यानं मासिक पाळीच्या वेदनांपासून आराम मिळतो. एका संशोधनानुसार, वेलचीचे अँटिऑक्सिडंट गुणधर्म पेशींचं नुकसान रोखण्यासाठी उपयुक्त आहेत. वेलची नियमित खाणं आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.