TRENDING:

Flax Seeds : आरोग्यासाठी उपयुक्त जवस, जवसाच्या बियांचे फायदे

Last Updated:

जवसाच्या बिया अनेक पाककृतींतही वापरल्या जातात. जवसाच्या बिया दिसायला लहान असतात पण आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर असतात.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : रोजच्या धावपळीत काम आणि आरोग्याचा ताण जाणवत असतो, यासाठी, काही घरगुती आणि नैसर्गिक उपाय निश्चित्तच उपयुक्त ठरतात. बहुतेक घरांमधे, अळशीचा म्हणजेच जवसाचा वापर केला जातो. जवसाच्या बिया अनेक पाककृतींतही वापरल्या जातात. जवसाच्या बिया दिसायला लहान असतात पण आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर असतात.
News18
News18
advertisement

रोजच्या आहारातही जवस भाजून, त्याची चटणी दह्यासोबत, तेलासोबत खाल्ल्यानं चांगली चव येते. त्वचा, केसांसाठी तसंच पचनक्रिया, हाडांसाठी जवस खाणं उपयुक्त ठरतं. कर्करोग, हृदयविकार यासारख्या विकारांपासून शरीराचं रक्षण करण्यासाठी जवसाच्या बिया उपयुक्त ठरतात.

जवसाच्या बियांचे फायदे -

1. निद्रानाश-

निद्रानाशाची समस्या असेल तर जवसाच्या बिया खाणं फायदेशीर ठरू शकतं.

2. डोळे-

advertisement

अळशीत आढळणारे गुणधर्म डोळ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतात. डोळ्यांची जळजळ आणि लालसरपणा दूर करण्यासाठी अळशी मदत करू शकते. यासाठी अळशीच्या बिया पाण्यात भिजवून त्या खाऊ शकता.

Cardamom : स्वादाबरोबरच औषधी गुणधर्मांसाठीही उपयुक्त, हिरव्या वेलचीचे भरपूर फायदे

3. वेदना आणि सूज-

वेदना आणि सूज कमी करण्यासाठी जवस खाणं खूप फायदेशीर मानलं जातं. अनेक प्रकारे जवस आहारात समाविष्ट केला जाऊ शकतो.

advertisement

4. कानाची सूज-

जवसातील गुणधर्म कानाची आलेली सूज बरी करण्यासाठी खूप फायदेशीर आहेत. त्यातील गुणधर्म शरीरातील वेदना कमी करण्यास मदत करू शकतात.

5. डोकेदुखी-

डोकेदुखीनं त्रास होत असेल तर जवसाच्या बिया आराम देऊ शकतात.

Neem : कडुनिंबाच्या पानांचे आरोग्यदायी फायदे, मौखिक आरोग्यापासून पचनासाठीही उपयुक्त

6. थायरॉईड-

थायरॉईडची समस्या कमी करण्यासाठी जवसाचं सेवन देखील करू शकता. त्यातील गुणधर्म थायरॉईडचा त्रास  कमी करण्यासाठी फायदेशीर मानले जातात.

advertisement

7. जखमा भरण्यासाठी -

जवस पावडर दूध आणि पाण्यात मिसळून सेवन करू शकता. यामुळे जखम कोरडी होण्यास मदत होते.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Flax Seeds : आरोग्यासाठी उपयुक्त जवस, जवसाच्या बियांचे फायदे
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल