TRENDING:

Gastric problems : गॅसच्या समस्येवर हा उपाय नक्की करुन पाहा, पोटातील गॅसपासून मिळेल आराम

Last Updated:

पोटात गॅस होत असेल तर माणूस अस्वस्थ होतो..यासाठी वेगवेगळे उपाय, औषधं उपलब्ध आहेत. त्यातलाच एक सोपा आणि घरगुती उपाय म्हणजे लिंबू पाणी. सकाळी रिकाम्या पोटी हे पाणी प्या, यामुळे पोट स्वच्छ होईल.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : पोटात गॅस होत असेल तर माणूस अस्वस्थ होतो..यासाठी वेगवेगळे उपाय, औषधं उपलब्ध आहेत. त्यातलाच एक सोपा आणि घरगुती उपाय म्हणजे लिंबू पाणी. सकाळी रिकाम्या पोटी हे पाणी प्या, यामुळे पोट स्वच्छ होईल.
News18
News18
advertisement

पोटात गॅस होत असल्याची तक्रार अनेक जण करतात. या समस्येमुळे पोटदुखी, डोकेदुखी आणि अपचनाचा त्रास होतो. जीवनशैलीतले बदल आणि खाण्यापिण्याच्या अनियमित सवयींमुळे पोटाच्या समस्यांचं प्रमाण वाढलंय. यातील सर्वात मोठी समस्या म्हणजे गॅस होणं. पोटात गॅस तयार झाल्यामुळे पोट फुगणं यासारख्या समस्या जाणवतात. अनेकदा पोटातील गॅसवर औषधं घेऊन उपचार केले जातात.

advertisement

पोटात गॅस होण्याची कारणं -

तळलेले आणि मसालेदार पदार्थ जास्त खाणं.

फायबर आणि पाण्याची कमतरता.

पटकन, वेगानं खाणं किंवा अन्न नीट न चावणं.

चहा, कॉफी किंवा कार्बोनेटेड पेयांचं जास्त सेवन.

तणाव आणि झोपेची कमतरता.

Walk empty stomach : रिकाम्या पोटी चाला, तब्येत राहिल तंदुरुस्त, मानसिक आरोग्यही राहिल चांगलं

पोटातील गॅसपासून मुक्ती मिळवण्यासाठी घरगुती उपाय

advertisement

पोटाशी संबंधित घाण आणि गॅसची समस्या दूर करायची असेल तर रोज सकाळी रिकाम्या पोटी एक खास घरगुती उपाय करून पहा.

कोमट पाणी: 1 ग्लास

लिंबू: अर्धा

जिऱ्याची पूड : १ चिमूटभर

मध: 1 टीस्पून (इच्छेनुसार)

कृती :

एक ग्लास कोमट पाण्यात अर्ध्या लिंबाचा रस पिळून घ्या.

त्यात चिमूटभर जिरेपूड घाला.

advertisement

हवं असेल तर त्यात मध घालून चांगलं मिसळा.

हे पेय रोज सकाळी रिकाम्या पोटी प्या.

Oranges - वजन वाढलंय, चिंता करु नका, संत्री खायला सुरुवात करा

लिंबू पाणी पिण्याचे फायदे :

लिंबू: लिंबामध्ये असलेल्या व्हिटॅमिन सी मुळे पचनक्रिया सुधारते आणि पोट साफ करण्यास मदत होते.

जीरं : जीरं खाण्यामुळे गॅस आणि पोट फुगण्याची समस्या कमी होते. त्यामुळे पचनशक्ती मजबूत होते.

advertisement

कोमट पाणी: कोमट पाण्यामुळे शरीराला डिटॉक्सिफाय करण्याची आणि पचन प्रक्रिया सुरळीत होते.

मध: मधामध्ये अँटिऑक्सिडेंट असतात ज्यामुळे पोटाचं आरोग्य सुधारतं.

हे पेय पिण्याचे फायदे:

पोटातील गॅसच्या समस्येपासून सुटका मिळेल.

पचनक्रिया चांगली होते.

पोट आतून स्वच्छ झाल्यानंतर शरीर हलकं वाटतं.

नैसर्गिकरित्या शरीराला डिटॉक्सिफाय करते.

या गोष्टी लक्षात ठेवा:

हा उपाय नियमितपणे करा.

तुमच्या आहारात फायबर आणि पाण्याचं प्रमाण वाढवा.

तणाव आणि फास्ट फूड टाळा.

पोटाशी संबंधित समस्या वारंवार होत असल्यास डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Gastric problems : गॅसच्या समस्येवर हा उपाय नक्की करुन पाहा, पोटातील गॅसपासून मिळेल आराम
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल