TRENDING:

Vitamins : वाढत्या वयानुसार घ्या प्रकृतीची काळजी, या आहारातून मिळेल जीवनसत्वांचा खजिना

Last Updated:

बहुतेकदा साठी-सत्तरीच्या टप्प्यावर चालण्यात अडचण, पायांत कमकुवतपणा आणि थकवा येतो. पण, काही आवश्यक जीवनसत्त्वं आणि खनिजं योग्य प्रमाणात घेतली तर या समस्या बऱ्याच प्रमाणात टाळता येतात. आरोग्यतज्ज्ञांच्या मते, उतारवयात योग्य आहाराबरोबरच सहा जीवनसत्त्वं घेणं आवश्यक आहे. 

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई :  वय वाढतं त्यानुसार स्नायू आणि हाडं कमजोर व्हायला सुरुवातत होते. बहुतेकदा साठी-सत्तरीच्या टप्प्यावर चालण्यात अडचण, पायांत कमकुवतपणा आणि थकवा येतो. पण, काही आवश्यक जीवनसत्त्वं आणि खनिजं योग्य प्रमाणात घेतली तर या समस्या बऱ्याच प्रमाणात टाळता येतात. आरोग्यतज्ज्ञांच्या मते, उतारवयात योग्य आहाराबरोबरच सहा जीवनसत्त्वं घेणं आवश्यक आहे.
News18
News18
advertisement

- व्हिटॅमिन डी - व्हिटॅमिन डीला सनशाइन व्हिटॅमिन असंही म्हणतात. हाडं आणि स्नायूंसाठी हे खूप महत्वाचं आहे. शरीरात कॅल्शियम चांगल्या पद्धतीनं पोहचण्यासाठी व्हिटॅमिन डीची मदत होते आणि यामुळे हाडं मजबूत होतात. त्यामुळे म्हातारपणात हे व्हिटॅमिन घेणं आवश्यक आहे. यासाठी दररोज वीस - तीस मिनिटं उन्हात बसू शकता. सूर्यप्रकाश हा व्हिटॅमिन डीचा सर्वोत्तम स्रोत आहे. याशिवाय, आहारात मासे, अंडी, दूध यासारख्या गोष्टींचा समावेश करू शकता.

advertisement

Weight Gain : वजन वाढवण्यासाठी सोपा मार्ग, या घरगुती उपायांची होईल मदत

- व्हिटॅमिन बी 12 - नसा आणि स्नायूंच्या आरोग्यासाठी व्हिटॅमिन बी 12 आवश्यक आहे. शरीराचं संतुलन राखण्यासाठी आणि पायांची ताकद राखण्यासाठी याचा उपयोग होतो. यासाठी डॉक्टर अंडी, मटण, मासे, दूध खाण्याची शिफारस करतात.

- व्हिटॅमिन सी

व्हिटॅमिन सी कोलेजन तयार करण्यास मदत करते. सांधे आणि स्नायूंना मजबूत ठेवण्यासाठी याचा उपयोग होतो. शरीराचं ऑक्सिडेटिव्ह नुकसान होण्यापासून देखील यामुळे संरक्षण होतं. आवळा, लिंबू, संत्री, पेरू आणि सिमला मिरची हे त्याचे चांगले स्रोत आहेत.

advertisement

- व्हिटॅमिन के2

कॅल्शियम हाडांपर्यंत पोहोचवण्यासाठी या व्हिटॅमिनची मदत होते, ज्यामुळे हाडे मजबूत होतात आणि फ्रॅक्चरचा धोका कमी होतो. व्हिटॅमिन के2 अंड्याचा पिवळा भाग, चीज, दही आणि हिरव्या भाज्यांत आढळतं.

Lungs Health : प्रत्येक श्वासासाठी फुफ्फुसं हवीत मजबूत, घरी करु शकता क्षमता चाचणी

- व्हिटॅमिन ई - यातल्या अँटिऑक्सिडंटमुळे स्नायूंचं वृद्धत्वाच्या लक्षणांपासून संरक्षण होतं. रोगप्रतिकारक शक्ती आणि रक्ताभिसरण देखील यामुळे सुधारतं. यासाठी डॉक्टर बदाम, तीळ, सूर्यफुलाच्या बिया आणि पालक खाण्याची शिफारस करतात.

advertisement

- मॅग्नेशियम- या सर्वांव्यतिरिक्त, डॉक्टर आहारात मॅग्नेशियमचा समावेश करण्याची शिफारस करतात. स्नायूंचं कार्य योग्यरीत्या होण्यासाठी हे खनिज आवश्यक आहे. मॅग्नेशियमच्या कमतरतेमुळे पायांत ताण आणि वेदना जाणवू शकतात. बदाम, काजू, चिया सीडस्, डाळी आणि डार्क चॉकलेट हे मॅग्नेशियमचे चांगले स्रोत आहेत.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सांधेदुखी होईल कमी, जेवणात समावेश करा कडीपत्ता आणि तिळाची चटणी, रेसिपीचा Video
सर्व पहा

प्रत्येकाची प्रकृती वेगळी असते त्यामुळे कोणतीही औषधं घेण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.

advertisement

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Vitamins : वाढत्या वयानुसार घ्या प्रकृतीची काळजी, या आहारातून मिळेल जीवनसत्वांचा खजिना
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल