Lungs Health : प्रत्येक श्वासासाठी फुफ्फुसं हवीत मजबूत, घरी करु शकता क्षमता चाचणी
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
आपला प्रत्येक श्वास पूर्ण होण्यासाठी फुफ्फुसांचं काम व्यवस्थित होणं अत्यावश्यक आहे. कारण शरीराला ऑक्सिजन पुरवण्याचं आणि कार्बन डायऑक्साइड काढून टाकण्याचं काम फुफ्फुसं करतात. अशा परिस्थितीत फुफ्फुसं निरोगी राहणं खूप महत्वाचं आहे. यासाठी घरीच काही सोपे उपाय करुन फुफ्फुसांचं आरोग्य, त्यांची क्षमता तपासता येते.
मुंबई : आपला प्रत्येक श्वास पूर्ण होण्यासाठी फुफ्फुसांचं काम व्यवस्थित होणं अत्यावश्यक आहे. कारण शरीराला ऑक्सिजन पुरवण्याचं आणि कार्बन डायऑक्साइड काढून टाकण्याचं काम फुफ्फुसं करतात. अशा परिस्थितीत फुफ्फुसं निरोगी राहणं खूप महत्वाचं आहे.
यासाठी घरीच काही सोपे उपाय करुन फुफ्फुसांचं आरोग्य, त्यांची क्षमता तपासता येते. हेल्थलाइनच्या अहवालानुसार, फुफ्फुसं योग्यरित्या काम करत आहेत की नाही हे काही सोप्या पद्धतींनी घरी जाणून घेऊ शकता. फुफ्फुसांचे आजार रोखण्यासाठी ही पायरी महत्त्वाची आहे.
- श्वास रोखण्याची चाचणी - ही चाचणी करण्यासाठी, हातात स्टॉपवॉच घ्या. सरळ बसा आणि दीर्घ श्वास घ्या. आता, स्टॉपवॉच सुरू करा आणि तुम्ही किती वेळ श्वास रोखू शकता ते पहा. जर श्वास तीस सेकंदांपेक्षा जास्त काळ रोखू शकत असाल, तर फुफ्फुस योग्य रीतीनं काम करतायत. जर पंधरा सेकंदांपेक्षा कमी काळ धरून ठेवू शकत असाल, तर फुफ्फुसातील कमकुवतपणाचं ते लक्षण असू शकतं.
advertisement
- जिना चढण्याची चाचणी
एक किंवा दोन मजले जिने चढा आणि श्वास घेण्यास त्रास होत आहे की नाही ते पहा. थोडं चढल्यानंतर श्वास घेण्यासाठी त्रास होत असेल, छातीत जडपणा जाणवत असेल किंवा थकवा येत असेल तर फुफ्फुसांमध्ये समस्या असू शकते. अशावेळी तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.
advertisement
- मेणबत्ती चाचणी
मेणबत्ती 1-2 फूट अंतरावर ठेवा. दीर्घ श्वास घेऊन ती विझवण्याचा प्रयत्न करा. हे सहजपणे शक्य झालं तर फुफ्फुसं सामान्यपणे काम करत आहेत. पण अनेक वेळा जोरात फुंका मारावा लागल्या तर ते फुफ्फुसांची शक्ती कमी असल्याचं लक्षण असू शकतं.
- घरी फुफ्फुसांची क्षमता कशी वाढवायची?
फुफ्फुसं स्वच्छ करण्यासाठी आणि त्यांची क्षमता वाढवण्यासाठी घरी हवा शुद्धीकरण यंत्राचा वापर करा. घरातील हवा स्वच्छ करण्यासाठी हवा शुद्धीकरण यंत्र बसवा. यामुळे धूळ, धूर आणि इतर हानिकारक कण काढून टाकण्यास मदत होते.
advertisement
- फिल्टर आणि व्हेंट्स स्वच्छ करा
घरात एसी, हीटर आणि बाथरूम व्हेंट्स बसवले असतील तर त्यांचे फिल्टर वेळोवेळी बदलत राहा. अस्वच्छ फिल्टरमुळे फुफ्फुसांत बॅक्टेरिया आणि धूळ जाऊ शकते.
- मोकळ्या हवेत फिरा
दररोज पार्क किंवा मोकळ्या जागेत थोडा वेळ घालवा. यामुळे फुफ्फुसांना ताजी हवा आणि ऑक्सिजन मिळतो, ज्यामुळे फुफ्फुसांचं कार्य चांगले होण्यास मदत होते.
advertisement
- श्वसनाचे व्यायाम करा
दररोज थोडा वेळ काढून श्वसनाचे व्यायाम करा. यामुळे फुफ्फुसांची क्षमता वाढू शकते. हे विशेषतः धूम्रपान करणाऱ्या आणि दम्याच्या रुग्णांसाठी फायदेशीर आहेत. याशिवाय चालणं, पोहणं, सायकलिंग किंवा नृत्य यासारखे एरोबिक व्यायाम देखील फुफ्फुसांची क्षमता वाढवतात. फुफ्फुसाचा आजार असेल तर व्यायाम सुरू करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या.
advertisement
- योग्य आहार घ्या
या सर्वांव्यतिरिक्त, पण महत्त्वाचं म्हणजे आहाराकडे लक्ष देणं देखील महत्त्वाचं आहे. फुफ्फुसांसाठी, व्हिटॅमिन -डी, दाहक-विरोधी पदार्थ (ग्रीन टी, ब्रोकोली, हळद, बेरी) आणि निरोगी चरबी (मासे आणि अंडी) खा. यामुळे फुफ्फुसांचा दाह आणि सूज कमी होते आणि फुफ्फुसं मजबूत होतात.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 02, 2025 8:10 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Lungs Health : प्रत्येक श्वासासाठी फुफ्फुसं हवीत मजबूत, घरी करु शकता क्षमता चाचणी


