Trikonasana : शारीरिक, मानसिक स्वास्थ्यासाठी उपयुक्त त्रिकोणासन, जाणून घ्या त्रिकोणासनाचे फायदे
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
लहानपणापासूनच योगासनांची सवय असेल तर शरीर तंदुरुस्त राहतंच, शिवाय व्यक्ती मानसिकदृष्ट्याही मजबूत होतं. अनेक योगासनांपैकी एक म्हणजे त्रिकोणासन. शारीरिक, मानसिक आजार तसंच मेंदू आणि स्नायूंवरचा ताण कमी करण्यासाठी हे आसन उपयुक्त आहे.
मुंबई : योगासनांमुळे शरीर लवचिक राहतं, त्यामुळे अनेकजण योगासनं नियमित करतात. मानसिक ताण, शारीरिक थकवा तसंच काही आजार असेल तर शरीर संतुलित आणि लवचिक राहण्यासाठी योगासनं करण्याचा सल्ला दिला जातो.
लहानपणापासूनच योगासनांची सवय असेल तर शरीर तंदुरुस्त राहतंच, शिवाय व्यक्ती मानसिकदृष्ट्याही मजबूत होतं. अनेक योगासनांपैकी एक म्हणजे त्रिकोणासन. शारीरिक, मानसिक आजार तसंच मेंदू आणि स्नायूंवरचा ताण कमी करण्यासाठी हे आसन उपयुक्त आहे.
त्रिकोणासन करण्यासाठी, प्रथम पाय एकमेकांपासून सुमारे तीन फूट अंतरावर पसरवा. दोन्ही हात खांद्यांच्या रेषेत ठेवा आणि शरीर संतुलित करा. उजवा पाय 90 अंश बाहेरच्या दिशेनं वळवा आणि डावा पाय थोडासा आतल्या दिशेनं वळवा. दीर्घ श्वास घ्या आणि हळूहळू श्वास सोडताना, कंबरेपासून उजवीकडे वाका. उजव्या हातानं उजव्या टाचेला स्पर्श करण्याचा प्रयत्न करा आणि डावा हात सरळ वर उचला. डोकं वळवा आणि वर पहा आणि नेहमीप्रमाणे श्वास घेत काही सेकंद या स्थितीत रहा आणि नंतर पुन्हा सामान्य स्थितीत जाण्याचा प्रयत्न करा.
advertisement
त्रिकोणासनाचे फायदे
मानसिक शांती मिळते -
हे आसन करताना हात, पाय आणि पाठीचा कणा असा त्रिकोणाचा आकार तयार करतो. त्यामुळे याला त्रिकोणासन हे नाव देण्यात आलं आहे. हे आसन केवळ शरीराला आकार देत नाही तर यामुळे मानसिक शांतीही मिळते.
advertisement
पाठदुखीचा त्रास कमी होतो -
त्रिकोणासनामुळे कंबर आणि पाठीचा कणा मजबूत होतो. तासन्तास बसून काम करणाऱ्यांसाठी किंवा ज्यांना पाठदुखीचा त्रास आहे त्यांच्यासाठी हे आसन खूप फायदेशीर आहे. यामुळे पाठीच्या नसांना योग्य ताण मिळतो आणि लवचिकता वाढते. तसंच, कंबरेभोवती जमा झालेली चरबी देखील हळूहळू कमी होते. यासाठी नियमित सराव आवश्यक आहे.
advertisement
फ्लॅट फूट - सपाट पाय असणाऱ्यांसाठी उपयुक्त
काहींना तळव्यामधे नैसर्गिक कमान नसते. यामुळे पाय दुखण्याची समस्या वाढते. त्रिकोणासनामुळे सपाट पाय म्हणजेच फ्लॅट फूट असणाऱ्यांचा त्रास कमी होतो. त्रिकोणासनाच्या सरावामुळे पायांत संतुलन येतं आणि तळव्याच्या स्नायूंना बळकटी मिळते. पायांचा तळवा, घोटा आणि पोटऱ्या योग्यरित्या काम करु शकतात. ज्यामुळे सपाट पायांच्या समस्येपासून आराम मिळतो. त्रिकोणासन नियमित केल्यानं, व्यक्तीला चालताना, धावताना आणि उभं राहताना स्थैर्य आणि आराम मिळतो.
advertisement
चांगली झोप मिळते
त्रिकोणासनामुळे ताण आणि चिंता कमी होते. हे आसन करताना आपण खोलवर श्वास घेतो तेव्हा मानसिक ताण आणि चिंता कमी होऊ लागते. हे आसन मेंदूला शांत करतं, ज्यामुळे एकाग्रता वाढते आणि झोपेची गुणवत्ता देखील सुधारते.
पचनव्यवस्था सुरळीत राहते
या आसनामुळे पचनसंस्था सुधारते. या आसनामुळे आतडी आणि पोटाच्या अवयवांवर हलका दबाव पडतो, ज्यामुळे पचनक्रिया व्यवस्थित होते आणि गॅस, अपचन, बद्धकोष्ठता यासारख्या समस्यांपासून आराम मिळतो. या आसनामुळे चयापचयाचा वेग वाढतो, ज्यामुळे अन्न लवकर आणि योग्यरित्या पचतं.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 02, 2025 5:50 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Trikonasana : शारीरिक, मानसिक स्वास्थ्यासाठी उपयुक्त त्रिकोणासन, जाणून घ्या त्रिकोणासनाचे फायदे


