Sleep : हे वाचून उडेल झोप, जास्त वेळ झोपणं येईल अंगाशी, वाचा सविस्तर

Last Updated:

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, 18 ते 60 वयोगटातील व्यक्तीसाठी दररोज 7 ते 8 तासांची झोप पुरेशी असते. शरीराची अंतर्गत दुरुस्ती, मेंदूची दुरुस्ती आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी हा काळ योग्य मानला जातो. तर नऊ तासांपेक्षा जास्त झोपलं तर आळस, अशक्तपणा आणि इतर मानसिक आणि शारीरिक समस्या वाढतात.

हळदीमध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात. हे स्वरतंतूंना बरे करण्यास आणि घशाची सूज कमी करून आराम देते.
हळदीमध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात. हे स्वरतंतूंना बरे करण्यास आणि घशाची सूज कमी करून आराम देते.
मुंबई : झोप म्हणजे शरीरासाठीचं इंधन. प्रत्येकाच्या झोपेच्या वेळा, कामाचं स्वरुप वेगळं असतं. काहींना कमी झोप असली तरी चालते, काहींना पूर्ण आणि आवश्यक सात ते आठ तासांची झोप गरजेची असते. योग्य वेळ झोप घेतली तर शरीरात ऊर्जा जाणवते. झोप आपल्या आरोग्यासाठी खूप महत्वाची आहे. चांगल्या झोपेमुळे शरीर आणि मनालाही आराम मिळतो. पण जास्त झोपणं देखील आपल्या आरोग्यासाठी हानिकारक ठरतं.
एखादी व्यक्ती दिवसातून नऊ तासांपेक्षा जास्त झोपत असेल तर त्याच्या अचानक किंवा अकाली मृत्यूचा धोका 34 टक्क्यांनी वाढू शकतो. एका संशोधनाद्वारे ही निरीक्षणं नोंदवण्यात आली आहेत. यासाठीचा अभ्यास अमेरिका आणि युरोपमधील आरोग्य संशोधनावर आधारित होता. लाखो नागरिकांच्या झोपेच्या सवयी आणि आरोग्याबद्दलचं विश्लेषण यात करण्यात आलं. यामुळे, त्यांचा मृत्यूचा धोका देखील सामान्य नागरिकांपेक्षा जास्त असल्याचं दिसून आलं.
advertisement
झोपेचं योग्य प्रमाण किती ?
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, 18 ते 60 वयोगटातील व्यक्तीसाठी दररोज 7 ते 8 तासांची झोप पुरेशी असते. शरीराची अंतर्गत दुरुस्ती, मेंदूची दुरुस्ती आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी हा काळ योग्य मानला जातो.
advertisement
तर नऊ तासांपेक्षा जास्त झोपलं तर आळस, अशक्तपणा आणि इतर मानसिक आणि शारीरिक समस्या वाढतात.
जास्त झोपेचे तोटे
- चयापचयाचा वेग कमी होतो, ज्यामुळे लठ्ठपणा येऊ शकतो.
- मेंदूचं कार्य कमकुवत होऊ शकतं, ज्यामुळे स्मरणशक्तीवर परिणाम होतो.
- नैराश्य आणि चिंता वाढण्याचा धोका वाढतो.
- हृदयरोग आणि स्ट्रोकसारख्या गंभीर आजारांचा धोका वाढतो.
advertisement
- शरीरात थकवा आणि कमी ऊर्जा राहते.
हे टाळण्यासाठी काय करावं ?
- रोज नियमित वेळी झोपण्याची आणि उठण्याची सवय लावा.
- झोपण्यापूर्वी मोबाईल किंवा स्क्रीनचा वापर कमी करा.
- रात्री कॅफिन आणि जड पदार्थ खाणं टाळा.
advertisement
- दिवसभर थकवा जाणवत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.
झोप महत्त्वाची आहे पण मर्यादित प्रमाणात. जास्त झोपणं हे कमी झोपण्याइतकंच हानिकारक असू शकतं.
म्हणून, दररोज 7-8 तास चांगली आणि गाढ झोप घेणं चांगलं. नऊ तासांपेक्षा जास्त झोप घेणाऱ्यांमधे अचानक किंवा अकाली मृत्यूचा धोका 34 टक्क्यांनी वाढतो असंही संशोधनातून दिसून आलं आहे.
advertisement
जास्त झोप टाळा आणि दिनचर्या निरोगी ठेवा.
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Sleep : हे वाचून उडेल झोप, जास्त वेळ झोपणं येईल अंगाशी, वाचा सविस्तर
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement