Hair Care : केसांचा नैसर्गिक रंग कायम ठेवा, घरच्या उपायानं केस राहतील काळे
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
पांढरे केस काळे करण्यासाठी बाजारात अनेक प्रकारची उत्पादनं उपलब्ध आहेत. तसंत यासाठी नैसर्गिक पद्धतींचाही वापर करु शकता. यासाठी घरी एक खास तेल बनवता येईल. यामुळे, केस पांढरे होण्याचं प्रमाण कमी होतं आणि केसांचा नैसर्गिक रंग टिकवून ठेवता येतो.
मुंबई : वयानुसार केस पांढरे होतातच पण लहान वयातही केस पांढरे होण्याची समस्या जाणवत असेल तर काही घरगुती उपाय यासाठी उपयुक्त ठरतात. अयोग्य आहार, ताणतणाव आणि रसायनांवर आधारित उत्पादनांचा जास्त वापर ही यामागची मुख्य कारणं मानली जातात.
पांढरे केस काळे करण्यासाठी बाजारात अनेक प्रकारची उत्पादनं उपलब्ध आहेत. तसंत यासाठी नैसर्गिक पद्धतींचाही वापर करु शकता. यासाठी घरी एक खास तेल बनवता येईल. यामुळे, केस पांढरे होण्याचं प्रमाण कमी होतं आणि केसांचा नैसर्गिक रंग टिकवून ठेवता येतो.
advertisement
हे आयुर्वेदिक तेल बनवण्यासाठी प्रथम एक लोखंडी तवा घ्या. यात शंभर मिली नारळ तेल आणि शंभर मिली तीळाचं तेल घाला आणि ते गरम करा. तेल थोडं गरम झाल्यावर त्यात मुठभर कढीपत्ता घाला. कढीपत्ता काळा होईपर्यंत उकळू द्या. यानंतर, गॅस बंद करा आणि तेल थंड होऊ द्या. तेल थंड झाल्यावर ते गाळून काचेच्या बाटलीत भरा. हे तेल आठवड्यातून दोन ते तीन वेळा केसांच्या मुळांना लावा. एक ते दोन तासांनी सौम्य शाम्पूनं केस धुवा.
advertisement
तीळाच्या तेलानं केसांच्या मुळांना पोषण मिळतं. याशिवाय, त्यात अँटीऑक्सिडंट्स आणि जीवनसत्त्व असतात. यामुळे केस काळे आणि जाड करण्यास मदत करतात. नारळाच्या तेलानं केस खोलवर मॉइश्चरायझ होतात आणि प्रथिनं कमी होण्यास प्रतिबंध करते. कढीपत्त्यात लोह, कॅल्शियम आणि बीटा-कॅरोटीन असतं, ज्यामुळे केस नैसर्गिकरित्या काळे राहण्यासाठी मदत होते.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
July 31, 2025 7:29 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Hair Care : केसांचा नैसर्गिक रंग कायम ठेवा, घरच्या उपायानं केस राहतील काळे