advertisement

बॉलिवूडवर शोककळा! 'सत्ते पे सत्ता' फेम अभिनेत्री काळाच्या पडद्याआड

Last Updated:

प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीचं 72 व्या वर्षी निधन. अभिनेत्रीच्या निधनाची माहिती मिळताच चाहत्यांना धक्का बसला आहे.

News18
News18
बॉलिवूड विश्वातून दु:खद बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध अभिनेत्री मधु मल्होत्रा यांचं निधन झालं आहे. वयाच्या 72 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बॉलिवूडची देखणी आणि टॅलेंटेड अभिनेत्री म्हणून तिची ओळख होती. टेलिव्हिजन विश्वातही त्यांनी त्यांच्या अभिनयाची छाप उमटवली होती. कर्ज, सत्ते पे सत्ता सारख्या हिट सिनेमात त्यांनी काम केलं. त्यांच्या निधनाची माहिती समोर आल्यानंतर चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मधु मल्होत्रा यांचं निधन 13 मार्च 2026 रोजी मुंबईत निधन झालं. वृद्धापकाळानं त्यांचं निधन झाल्याचं सांगम्यात येत आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती अस्वस्थ होती. बॉलिवूडमध्ये 70-80 चा काळ मधु मल्होत्रा यांनी गाजवला.
सिनेमात त्यांनी कधी सहाय्यक भूमिका साकारून आपल्या सहज अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली.
advertisement
अभिनेत्री मधु मल्होत्रा यांनी सत्ते पे सत्ता, रिश्ता कागजा का, कर्ज, हिरो, विश्वानाथ, कयामत सारख्या सिनेमात काम केलं होतं. त्यांनी प्रामुख्याने अनेक कौटुंबिक आणि इमोशनल सिनेमात केलं होतं. त्यांच्या अभिनयाबरोबरच त्यांचं वैयक्तिक आयुष्य देखील कायम चर्चेत राहिलं.
90 च्या दशकात त्यांनी प्रसिद्ध खलनायक महेश आनंद यांच्याबरोबर लग्न केलं. मधु यांच्याबरोबर आनंद यांचं तिसरं लग्न केलं. त्यांची याआधी दोन लग्न काही कारणांनी मोडली होती. मधु आणि आनंद यांचं लग्नही फार काळ टिकलं नाही. डिवोर्सनंतर मात्र मधु यांनी स्वत:ला कायम लाइमलाइटपासून दूर ठेवलं.
advertisement
मधु मल्होत्रा यांच्या जाण्याने बॉलिवूडने एक हरहुन्नरी अभिनेत्री गमावली आहे. त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीही न भरून निघणारी आहे. मधु यांच्या निधनाची माहिती समोर येताच अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
बॉलिवूडवर शोककळा! 'सत्ते पे सत्ता' फेम अभिनेत्री काळाच्या पडद्याआड
Next Article
शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठी संधी, पैसे तयार ठेवा; 34 वर्षांनंतरची प्रतिक्षा पूर्ण होणार, चालून आला गोल्डन चान्स
शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठी संधी, पैसे तयार ठेवा; 34 वर्षांनंतरची प्रतिक्षा पूर्ण होणार
  • गुंतवणूकदारांसाठी सर्वात मोठा जॅकपॉट

  • LIC आणि SBI कडून होणार शेअर्स विक्री

  • तुमचा वाटा मिळवण्यासाठी आतापासूनच प्लॅन करा

View All
advertisement