PCOS : पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम म्हणजे काय ? हे केस गळण्याचं कारण असू शकतं का ?

Last Updated:

पीसीओएसमध्ये हार्मोनल बदलांमुळे महिलांचे केस गळू लागतात, केस पातळ होतात किंवा समोरच्या भागात पातळ होतात. पण, निरोगी जीवनशैली आणि योग्य आहारानं ही समस्या बऱ्याच प्रमाणात बरी होऊ शकते ही दिलासादायक बाब आहे.

News18
News18
मुंबई: सध्या PCOS किंवा पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम होण्याचं प्रमाण वाढत चाललंय‌. ही समस्या असलेल्या महिलांच्या शरीरात अँड्रोजनचं (पुरुष संप्रेरक) प्रमाण वाढतं, ज्यामुळे केस गळतीसारख्या समस्या जाणवू शकतात.
यापैकी एक म्हणजे केस गळण्याची समस्या. पीसीओएसमध्ये हार्मोनल बदलांमुळे महिलांचे केस गळायला सुरुवात होते, केस पातळ होतात किंवा समोरच्या भागात पातळ होतात.
advertisement
पण, निरोगी जीवनशैली आणि योग्य आहारानं ही समस्या बऱ्याच प्रमाणात बरी होऊ शकते. या संदर्भात प्रसिद्ध पोषणतज्ज्ञ लिमा महाजन यांनी त्यांच्या इंस्टाग्राम हँडलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे.
या व्हिडिओत, PCOS मुळे केस गळती रोखण्यासाठी एक प्रभावी घरगुती उपाय त्यांनी शेअर केला आहे. PCOS किंवा हार्मोनल बदलांमुळे केसांची समस्या कमी करण्यासाठी, आहारात दोन बियांचा समावेश करू शकता.
advertisement
यासाठी, एक चमचा मेथीचे दाणे रात्रभर पाण्यात भिजत ठेवा. दुसऱ्या दिवशी सकाळी रिकाम्या पोटी हे पाणी प्या आणि बिया चावा. यामुळे हार्मोन्स संतुलित राहतात आणि केसांची वाढ सुधारते.
एक चमचा जवस थोडे भाजून त्याची पावडर बनवा. ते दही, ओट्स किंवा स्मूदीमध्ये मिसळा आणि दररोज खा. जवसमध्ये ओमेगा-3 फॅटी एसिड असतं जे टाळूला पोषण देतं आणि केस गळणं कमी करतं.
advertisement
पीसीओएस व्यतिरिक्त, लिमा महाजन यांनी केसांची काळजी घेण्यासाठी काही इतर उपाय सुचवले आहेत.
केस लोहाच्या कमतरतेमुळे गळत असतील, तर या आहारात मनुका, मोरिंगा पावडर आणि कढीपत्त्याचा समावेश करा.
केस वारंवार तुटत असतील आणि पांढरे होत असतील तर दररोज काळे तीळ खाण्याची शिफारस त्यांनी केली आहे. केसांच्या वाढीसाठी बीट किंवा डाळिंब खा. पातळ आणि कमकुवत केसांसाठी आवळा खा.
advertisement
हे सर्व उपाय नैसर्गिक आहेत आणि शरीराला आतून बरं करतात. यासोबतच, जीवनशैलीत योग्य बदल आणि आहार योग्य असेल तर काही आठवड्यांत फरक दिसेल.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
PCOS : पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम म्हणजे काय ? हे केस गळण्याचं कारण असू शकतं का ?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement