Pimples : चेहऱ्याची अशी घ्या काळजी, नैसर्गिक फेसपॅकनं चेहऱ्याची चमक राहिल कायम
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
पिंपल्स लवकर जात नाहीत आणि फुटले तर चेहऱ्यावर खुणा राहतात. या काळ्या डागांमुळे चेहऱ्याची चमक कमी होते. यासाठी मध, हळद, कडुनिंब, टोमेटोचा वापर करुन नैसर्गिक फेसपॅक बनवता येतात.
मुंबई : ऋतू कोणताही असला तरी त्वचेच्या समस्या जाणवू शकतात. अशात चेहऱ्यावरच्या फोडांमुळे अनेकांना त्रास होतो. पिंपल्स लवकर जात नाहीत आणि फुटले तर चेहऱ्यावर खुणा राहतात. या काळ्या डागांमुळे चेहऱ्यावरील चमक कमी होऊ लागते.
या फोड आणि मुरुमांपासून मुक्त होण्यासाठी आणि चेहऱ्यावरील डाग दूर करण्यासाठी, फेस पॅक वापरून पाहू शकता. योगगुरू दीपक शर्मा यांनी मुरुम दूर करण्यासाठी फेस पॅक कसा बनवायचा याबद्दल इंस्टाग्रामवर माहिती दिली आहे.
मुरुमांसाठी फेस पॅक
हा फेस पॅक बनवण्यासाठी, कडुनिंब, कोरफड जेल आणि टोमॅटो मिसळा आणि बारीक करा. या पेस्टमध्ये एक चमचा बेसन आणि एक चमचा मध घाला, तुमचा फेस पॅक तयार आहे. हा फेस पॅक 15 ते 20 मिनिटं चेहऱ्यावर लावता येतो आणि नंतर धुऊन टाकता येतो.
advertisement
मध आणि दालचिनीचा फेस पॅकही चेहरा तजेलदार करण्यासाठी फायदेशीर आहे. एक चमचा दालचिनी आणि दोन चमचे मध घालून पेस्ट बनवा. ही पेस्ट चेहऱ्यावर दहा ते पंधरा मिनिटं लावा आणि नंतर धुवा.
हळद आणि दह्याच्या फेस पॅकमुळेही मुरुम कमी होतात. दोन चमचे दह्यात एक चमचा हळद मिसळून फेस पॅक बनवा. हा फेस पॅक वीस मिनिटं लावा आणि नंतर धुवा. हा फेस पॅक आठवड्यातून एकदा लावता येतो.
advertisement
ग्रीन टी आणि मध मिसळून फेस पॅक तयार करा. हा फेस पॅक बनवण्यासाठी ग्रीन टी म्हणजे टी पावडर उकळवा आणि नंतर तो थंड करा. त्यात मध मिसळून पेस्ट तयार करा. हा फेस पॅक चेहऱ्यावर लावल्यानं अँटीबॅक्टेरियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म मिळतात.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
July 29, 2025 7:38 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Pimples : चेहऱ्याची अशी घ्या काळजी, नैसर्गिक फेसपॅकनं चेहऱ्याची चमक राहिल कायम


