Lungs : जागतिक फुफ्फुस कर्करोग दिन, फु्फ्फुसांचं आरोग्य जपण्यासाठी या टिप्सचा होईल उपयोग
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
आज जागतिक फुफ्फुस कर्करोग दिनानिमित्तानं ही महत्त्वाची माहिती नक्की वाचा. कारण लक्षणं दिसत असूनही दुर्लक्ष केलं आणि आपण आता काळजी घेतली नाही तर श्वसनाच्या समस्या वाढत जातात. पण काही दैनंदिन सोप्या सवयींनी फुफ्फुसं दीर्घकाळ निरोगी राहू शकतात.
मुंबई : तुम्ही कुठे राहता, तिथली हवा कशी आहे, तुम्ही कोणत्या स्वरुपाचं काम करता यावर तुमची तब्येत अवलंबून असते. कारण शहरी हवेतलं वाढतं प्रदूषण, बदलती जीवनशैली आणि धूम्रपानासारख्या सवयी यामुळे फुफ्फुसं झपाट्यानं कमकुवत होतायत.
आज जागतिक फुफ्फुस कर्करोग दिनानिमित्तानं ही महत्त्वाची माहिती नक्की वाचा. कारण लक्षणं दिसत असूनही दुर्लक्ष केलं आणि आपण आता काळजी घेतली नाही तर श्वसनाच्या समस्या वाढत जातात. पण काही दैनंदिन सोप्या सवयींनी फुफ्फुसं दीर्घकाळ निरोगी राहू शकतात.
अनेकदा श्वसनासंदर्भातले बदल उशीरा कळणं, उशीरा निदान होऊन त्यानंतर म्हणजेच उशीरा होणाऱ्या उपचारांमुळे कर्करोगाचं प्रमाण वाढत जातं. याबद्दलच जनजागृती करण्याच्या दृष्टीनं आजचा दिवस महत्त्वाचा आहे.
advertisement
निरोगी आहार घ्या-
आपण काय खातो, याचा थेट परिणाम फुफ्फुसांच्या कार्यावर होतो. टोमॅटो, गाजर, हिरव्या पालेभाज्या आणि फळं यात अँटिऑक्सिडंट्स असतात आणि यामुळे फुफ्फुसांची सूज कमी होते आणि ऊतींची दुरुस्ती होते. डॉक्टरांच्या मते, ओमेगा-3 फॅटी एसिड, व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ई असलेले अन्नपदार्थ फुफ्फुसांना बळकटी देण्यास मदत करू शकतात.
advertisement
नियमित व्यायाम करा-
आठवड्यातून किमान पाच दिवस तीस मिनिटं जलद चालणं, योगा किंवा सायकलिंग करा. यामुळे फुफ्फुसांची ऑक्सिजन क्षमता वाढते आणि श्वसनसंस्था मजबूत होते.
हवेच्या गुणवत्तेच्या सूचनांवर लक्ष ठेवा-
आजकाल अनेक अॅप्सद्वारे, परिसरातील एअर क्वालिटी इंडेक्सची माहिती मिळते. AQI 150 पेक्षा जास्त असेल तर बाहेर जाणं टाळा किंवा मास्क वापरा. घरी एअर प्युरिफायर वापरणं देखील फायदेशीर आहे.
advertisement
धूम्रपानापासून दूर रहा-
सिगरेट, बिडी किंवा हुक्का असा कोणत्याही प्रकारचा धूर फुफ्फुसांच्या पेशींना नुकसान पोहोचवतो आणि कर्करोगाचा धोका अनेक पटीनं वाढवतो. मद्यपान करू नका आणि कोणी धूम्रपान करत असेल तर तिथून दूर जा.
advertisement
नियमित तपासणी करा-
वारंवार खोकला, श्वास घेण्यास त्रास किंवा छातीत जडपणा जाणवत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका.
डॉक्टरांकडून तपासणी करून घ्या. फुफ्फुसांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करु नका, कारण वेळीच लक्षणं ओळखणं चांगल्या उपचारांसाठीची पहिली पायरी आहे.
येत्या काळात फुफ्फुसांचा आजार आणि कर्करोगाच्या धोक्यापासून केवळ योग्य दिनचर्याच रक्षण करू शकते. म्हणून आजच योग्य श्वसनासाठी योग्य आहार, दिनचर्येचं महत्त्व समजून घ्या. आणि या 5 सवयी अंगीकार करा. कारण जर फुफ्फुसे मजबूत असतील तर जीवनाची गती देखील अबाधित राहील.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 01, 2025 2:57 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Lungs : जागतिक फुफ्फुस कर्करोग दिन, फु्फ्फुसांचं आरोग्य जपण्यासाठी या टिप्सचा होईल उपयोग