Gut Health : चाळिशीनंतर पोटाच्या आरोग्याकडे द्या विशेष लक्ष, पचनसंस्थेची अशी घ्या काळजी

Last Updated:

शरीराचं संपूर्ण आरोग्य अबाधित राहावं म्हणून योग्य वेळी लक्षणं ओळखणं आणि त्यासाठीचे उपाय करणं महत्वाचं आहे. चाळिशीनंतर आतड्यांच्या आरोग्याशी संबंधित आव्हानं कोणती आहेत, कोणते नवीन विकार उद्भवू शकतात आणि पचनसंस्था निरोगी ठेवण्यासाठी कोणते सोपे उपाय करू शकता याविषयीची माहिती.

News18
News18
मुंबई : चाळिशीच्या टप्प्यावर शरीर मोठ्या संक्रमणातून जात असतं. या काळात शरीरात मोठे बदल होतात आणि त्याचा विशेष परिणाम पचनसंस्थेवर म्हणजेच आतड्यांच्या आरोग्यावर दिसून येतो. यामुळे पोट फुगणं, गॅस, बद्धकोष्ठता, आम्लपित्त यासारख्या समस्या जाणवायला सुरुवात होते. ज्या कधीकधी गंभीर जीआय विकारांमध्ये बदलू शकतात म्हणजेच Gastrointestinal Disorders. पोट, आतडी, पचनाशी संबंधित समस्यांचं प्रमाण या काळात वाढतं.
शरीराचं संपूर्ण आरोग्य अबाधित राहावं म्हणून योग्य वेळी ही लक्षणं ओळखणं आणि त्यासाठीचे उपाय करणं महत्वाचं आहे. चाळिशीनंतर आतड्यांच्या आरोग्याशी संबंधित आव्हानं कोणती आहेत, कोणते नवीन विकार उद्भवू शकतात आणि पचनसंस्था निरोगी ठेवण्यासाठी कोणते सोपे उपाय करू शकता पाहूया.
advertisement
चाळिशीनंतर आतड्यांसंबंधी समस्या का वाढतात?
एंजाइम्सची कमतरता: वयानुसार, पाचक एंजाइम्सचं प्रमाण कमी होतं, ज्यामुळे अन्न योग्यरित्या पचत नाही.
हार्मोनल बदल: हे बदल आतड्यांच्या क्रियांवर परिणाम करू शकतात.
फायबर आणि पाण्याची कमतरता: या वयात बरेच जण कमी फायबर असलेलं अन्न खातात आणि कमी पाणी पितात, ज्यामुळे बद्धकोष्ठता होऊ शकते.
औषधं: रक्तदाब, मधुमेह आणि इतर आजारांसाठीची औषधं आतड्यांवर परिणाम करू शकतात.
advertisement
चाळीशीनंतर जाणवणारे जठराचे विकार
आयबीएस (इरिटेबल बोवेल सिंड्रोम)
जीईआरडी (गॅस्ट्रोएसोफेजियल रिफ्लक्स रोग)
गॅस, पोट फुगणं आणि पोटात मुरडा येणं
आतड्यांमधील संसर्ग किंवा सूज
या समस्या गंभीर आजारात बदलू नयेत म्हणून वेळीच ओळखणं महत्वाचं आहे, त्यामुळे वेळीच उपचार घेणंही शक्य होईल.
आतड्यांचे आरोग्य सुधारण्यासाठीचे उपाय
1. फायबरयुक्त पदार्थ खा: आहारात फळं, भाज्या आणि बीन्सचा समावेश करा.
advertisement
2. भरपूर पाणी प्या: दररोज 8-10 ग्लास पाणी प्यायल्यानं पचनक्रिया चांगली राहते.
3. ताण व्यवस्थापन: योग आणि ध्यानानं मानसिक ताण कमी करण्यासाठी मदत होते. मानसिक ताण आणि आतड्यांचं आरोग्य याचा थेट संबंध आहे.
4. प्रोबायोटिक्स: दही, ताक किंवा प्रोबायोटिक सप्लिमेंट्स आतड्यांसाठी फायदेशीर आहेत.
advertisement
5. शारीरिक हालचाल : दररोज तीस मिनिटं चालणं किंवा हलका व्यायाम केल्यानं पचन सुधारतं. चाळिशीनंतर आतड्यांच्या आरोग्याकडे लक्ष देणं हा केवळ पोटाच्या समस्या टाळण्याचा एक मार्ग नाही तर एकूण आरोग्य राखण्याचा देखील एक मार्ग आहे. निरोगी आहार, सक्रिय जीवनशैली आणि मानसिक शांती स्वीकारून, तुम्ही आतड्यांच्या समस्यांवर मात करू शकता आणि वयानुसारही निरोगी राहू शकता.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Gut Health : चाळिशीनंतर पोटाच्या आरोग्याकडे द्या विशेष लक्ष, पचनसंस्थेची अशी घ्या काळजी
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement