Yoga Asana : लठ्ठपणा होईल कमी, शरीर दिसेल सुडौल, पाच योगासनांची होईल मदत
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
खूप व्यायाम आणि विविध युक्त्या करूनही लठ्ठपणा कमी व्हायला वेळ लागतो. लठ्ठपणा हळूहळू कमी करण्यासाठी पाच योगासनांची मदत होईल.
मुंबई : लठ्ठपणा एकदा शरीराला चिकटला की सहज जात नाही. खूप व्यायाम आणि विविध युक्त्या करूनही लठ्ठपणा कमी व्हायला वेळ लागतो. लठ्ठपणा हळूहळू कमी करण्यासाठी पाच योगासनांची मदत होईल.
1- सूर्यनमस्कार
सूर्यनमस्कार केल्यानं संपूर्ण शरीर खूप सक्रिय राहतं. या आसनात बारा सूर्य नमस्कार आहेत. शरीरात जमा झालेली चरबी कमी करण्याचं काम यामुळे होतं. सूर्यनमस्कार नियमितपणे केल्यानं शरीराचं चयापचय चांगलं राहतं.
2- पर्वतासन
पर्वतासनामुळे वजन झपाट्यानं कमी होतं. तसंच हे आसन पोटाच्या स्नायूंना बळकटी देतं, ज्यामुळे व्यक्तीला पचनाच्या समस्या येत नाहीत. या आसनामुळे चरबी कमी होते तसंच पाठीचा कणा देखील मजबूत राहतो.
advertisement
धनुरासनात, व्यक्तीला धनुष्यासारखे आसन करावं लागतं, ज्यामुळे शरीरातील चरबी वेगानं कमी होते. या योगासनामुळे पोट, कंबर आणि मांड्यांवर जमा झालेली अतिरिक्त चरबी कमी होते. यासोबतच शरीराची पचनक्रियाही चांगली राहते.
4. त्रिकोणासन
त्रिकोणासनात, शरीराचं संतुलन त्रिकोणाच्या आकारात करावं लागतं, ज्यामुळे शरीरातील चरबी कमी होते. या आसनामुळे पोट, कंबर आणि मांड्यांमधील चरबी झपाट्याने कमी होते. तसेच, या योगासनामुळे पचनक्रिया देखील सुधारते.
advertisement
5. शशांकासन
हे आसन करण्यासाठी, दोन्ही पाय वाकवून आणि गुडघे जमिनीला स्पर्श करून बसा. नंतर कपाळ जमिनीवर ठेवा आणि दोन्ही हात पुढे पसरवा. हे आसन केल्यानं पोट लवकर आकुंचन पावतं आणि मांड्यांवरची चरबी देखील कमी होते. यासोबतच शरीरातील रक्ताभिसरण सुधारते.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 01, 2025 6:58 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Yoga Asana : लठ्ठपणा होईल कमी, शरीर दिसेल सुडौल, पाच योगासनांची होईल मदत


