फसवणुकीचा धोका वाढला
पावसाळ्यात अनेकदा खराब, बुरशी लागलेले किंवा कीड लागलेले मशरूम विक्रीस येतात. हे मशरूम खाल्ल्यास आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे खवय्यांनी मशरूम खरेदी करताना काही महत्त्वाच्या गोष्टी तपासून घ्यायला हव्यात.
Monsoon Health Tips: पावसाळ्यात पोटाला जपा, आहारात हे नसेल तर तब्येत आणखी बिघडेल!
काय काळजी घ्यावी?
advertisement
वीर फॉर्मचे ओम वीर यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, “मशरूम घेताना त्याचा रंग तपासा. ओलसरपणा जास्त असेल तर मशरूम ताजं नाही. पांढऱ्या मशरूमवर जर काळपट डाग दिसत असतील तर ते बुरशीचे लक्षण आहे. तसंच मशरूमची देठं सडलेली, नरम असतील तर ती खरेदी करू नयेत. शक्यतो प्रमाणित विक्रेत्यांकडूनच मशरूम खरेदी करावं.”
चांगले मशरुम कसे ओळखाल?
रंग: ताजी मशरूम पांढऱ्या, सौम्य रंगाच्या व स्वच्छ दिसतात.
घट्ट पोत: मशरूमचा टोकाचा भाग (कॅप) घट्ट आणि हलकासा लवचीक असतो.
सुगंध: नैसर्गिक मशरुमला सुगंध असतो. कोणताही उग्र किंवा आंबट वास येत नाही.
ओलसरपणा: थोडासा ओलसरपणा असतो, पण चिकटपणा किंवा सडलेपण जाणवत नाही.
देठ: देठ मजबूत आणि घट्ट असतो. नरम वा काळपट झालेला नसतो.
खराब मशरूम कशी ओळखाल?
बुरशी किंवा डाग: कॅपवर काळपट, हिरवट डाग किंवा बुरशीसारखी पुटं दिसत असतील तर ती मशरूम खराब आहे.
सडलेला वास: खराब मशरूममधून आंबूस, सडलेला किंवा उग्र वास येतो.
चिकटपणा: कॅप किंवा देठ हाताला चिकट वाटत असल्यास ती मशरूम वापरणे टाळावे.
नरम पोत: देठ दबताच खचला तर ती अळिंबी खाण्यायोग्य नाही.
कीड लागलेली: मशरूमवर छिद्रं असतील किंवा कीटक दिसत असतील, तर ती फेकून द्यावी.