नासपती हे वरच्या बाजूला थोडे बारीक आणि खालून गोल आकारात असते, ज्याला पीअर शेप म्हणतात. नासपती हे फळ कोलेस्ट्रॉल मुक्त आहे आणि 100 कॅलरी पॅकेज मध्ये सर्व पोषक घटकांनी भरलेले आहे, तसेच नासपती फळाचा हृदयाचे आरोग्य सुधारणे, रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करते, या गुणधर्मामुळे ते केवळ स्वादिष्ट फळ नसून, निरोगी आरोग्यासाठी बाकी फळांसोबतच उत्तम पर्याय आहे, असे डॉ. संचेती सांगतात.
advertisement
Kolhapuri Mutton: गटारीसाठी अस्सल कोल्हापुरी मटण, असं बनवाल तर बोटं चाखत खाल, एकदम झणझणीत रेसिपी!
नासपती हे फळ बाजारात सर्वत्र उपलब्ध असते. तसेच या फळात व्हिटामिन बी, सी आणि मिनरल्स भरपूर प्रमाणात असतात. तसेच हार्डीसीस, ब्लड प्रेशर, डायबिटीजसाठी मोठा फायदा मिळतो. याबरोबरच नासपती वजन कमी करण्यास देखील मदत करते. नासपतीमध्ये कॅलरी कमी आणि पाण्याचे प्रमाण जास्त असते. तसेच फायबरचे प्रमाण देखील जास्त असते. हे संयोजन वजन कमी करण्यासाठी लाभदायी ठरते, असंही डॉक्टर सांगतात.
साखरेची पातळी नियंत्रित करते
साखर नैसर्गिकरित्या सर्व फळांमध्ये आढळते, परंतु इतर फळांच्या तुलनेत फळाचा ग्लायसेमिक निर्देशांक कमी असतो, त्यामुळे त्याचे सेवन मधुमेहाच्या रुग्णांसाठी देखील फायदेशीर आहे. हे रक्तातील साखरेची पातळी रोखण्यास मदत करते. मात्र, ते कमी प्रमाणात सेवन केले पाहिजे, असे डॉ. संचेती यांनी सांगितले.
दरम्यान, दैनंदिन जीवनात लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनी 'नासपती' हे फळ खाणे आरोग्यासाठी लाभदायी आणि अनेक आजारांसाठी फायदेशीर ठरत आहे.