जमुई : आता पावसाळा सगळीकडे बऱ्यापैकी सुरू झालाय. त्यामुळे ताप, सर्दी, खोकला होऊच शकतो. परंतु हे आजार हलक्यात घेऊ नका. तर, ते होऊ नये यासाठी काळजी घ्या. चहा जास्त पिऊ नये, असं आहारतज्ज्ञ वारंवार सांगतात. कारण त्यामुळे त्रास होऊ शकतो. मात्र आज आपण एक असा चहा पाहणार आहोत, ज्यामुळे तुमचं शरीर ऊर्जावान राहील आणि रोगप्रतिकारक शक्तीही वाढेल. त्यामुळे आजारांशी सामना करण्याची ताकद मिळेल.
advertisement
डॉ. रास बिहारी तिवारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, तुळशीचा चहा आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असतो. यातून रोगप्रतिकारक शक्ती कमालीची वाढते. तुळशीत अँटीऑक्सिडंट आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म भरपूर प्रमाणात असतात.
हेही वाचा : Monsoon kitchen tips : पावसाळ्यात 'या' गोष्टींची घ्या काळजी, नाहीतर पडाल आजारी
या चहामध्ये आलं घातलं तर उत्तम. आल्यात अँटीइंफ्लेमेटरी आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात. त्यामुळे सर्दी, खोकल्यावर हा चहा रामबाण ठरतोच, शिवाय अपचन आणि गॅसचा त्रासही होत नाही.
याव्यतिरिक्त, हनी ग्रीन टी, लेमन टी किंवा पुदिना टी पिणंही शरिरासाठी फायदेशीर ठरतं. यामुळेसुद्धा शरीर ऊर्जावान राहतं आणि आजारांवर मात करण्याची शक्ती मिळते. मात्र कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईटच. त्यामुळे चहासुद्धा प्रमाणातच घ्यावा.
सूचना : इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. मात्र आपण आपल्या आरोग्यासंबंधित कोणताही निर्णय घेण्यापूर्वी स्वतः डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कोणत्याही नुकसानासाठी न्यूज18 मराठी जबाबदार नसेल.