हे हेअर मास्क घरी बनवता येतात, आणि केसांना लावल्यास केसांचा कोरडेपणा कमी होतो, केस मऊ होतात आणि केसांची चमक कायम राहते. हे हेअर मास्क बनवणंही खूप सोपं आहे.
केळी आणि दही हेअर मास्क -
हा हेअर मास्क बनवण्यासाठी एक केळं कुस्करुन घ्या. त्यात थोडा मध आणि दही घालून पेस्ट बनवा.
advertisement
हा तयार हेअर मास्क 30 ते 40 मिनिटं केसांवर ठेवल्यानंतर डोकं धुवून स्वच्छ करा. या हेअर मास्कमधून
केसांना लॅक्टिक ॲसिड, जीवनसत्त्वं आणि पोटॅशियम मिळतं, ज्यामुळे केसांना चमक येते.
Peanuts : शेंगदाणे खाल्ल्यानंतर पाणी का पिऊ नये ? आयुर्वेदानुसार काय योग्य आणि काय अयोग्य ?
दूध आणि मध मास्क -
दूध आणि मधापासून बनवलेला हेअर मास्कही उपयुक्त आहे. या हेअर मास्कमुळे केस इतके मऊ होतात.
हा हेअर मास्क बनवण्यासाठी एका भांड्यात २ चमचे दूध आणि थोडा मध घालून मिक्स करा. आता हे मिश्रण केसांना मुळापासून टोकापर्यंत लावा आणि नंतर धुवून काढा. हा हेअर मास्क 20 मिनिटांसाठी केसांवर लावता येतो.
अंडी आणि दही हेअर मास्क -
हा हेअर मास्क बनवण्यासाठी एका अंड्यामध्ये ३ चमचे दही मिसळा. हे मिश्रण अर्धा तास
केसांवर ठेवल्यानंतर केस धुवा. केस मऊ होतात आणि चमकदार दिसतात.
गर्भनिरोधक गोळ्यांबाबत महत्त्वाची बातमी, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
दही आणि लिंबाचा रस मास्क -
केस मऊ दिसण्यासाठी, हा फेस मास्क वापरून पहा. अर्धा कप साधं दही घ्या आणि
त्यात एका लिंबाचा रस घाला. हा हेअर मास्क केसांवर 30 ते 35 मिनिटं लावा आणि नंतर धुवा.
पण तुम्हाला स्काल्प ( Scalp) म्हणजे टाळूसंबंधित काही तक्रारी असतील तर
तर लिंबाचा रस लावणं टाळा.
मध आणि नारळ तेल मास्क -
हा हेअर मास्क लावण्यासाठी २ चमचे खोबरेल तेल आणि एक चमचा मध मिसळा. हा हेअर मास्क केसांवर अर्धा तास ठेवा आणि नंतर शॅम्पूनं केस धुवा. केस मऊ आणि चमकदार दिसू लागतील.
