रांची : आयुर्वेदात विविध वनस्पतींचे उपयोग दिलेले आहेत. त्यापैकी काही वनस्पती अगदी आपल्या बागेत असतात, तर काही वनस्पतींची आपल्याला नावंही माहित नसतात. तुम्ही कधी घायपात (Agave) नाव ऐकलंय का? ही आहे बहुपयोगी वनस्पती. या वनस्पतीच्या कणाकणात औषधी गुणधर्म दडलेले असतात, असं म्हणायला हरकत नाही.
आयुर्वेदिक डॉक्टर राजेश पाठक सांगतात, घायपातच्या पानांचा रस आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त असतो. आरोग्याच्या अनेक तक्रारी या रसामुळे चुटकीसरशी दूर होऊ शकतात. घायपात हे नाव जरी नवं वाटत असलं, तरी हे रोप ओळखणं सोपं आहे. त्याचा आकार मोठा आणि पानं कोरफडासारखी लांब असतात. आरोग्याला या वनस्पतीचे नेमके काय फायदे होतात, जाणून घेऊया.
advertisement
हेही वाचा : लिंबू केसांमध्ये चोळल्यावर खरंच कोंडा जातो का? नेमका उपाय काय?
पचनसंस्थेसाठी फायदेशीर : शरिरात पौष्टिक अन्न जाणं आणि त्याचं व्यवस्थित पचन होणं आवश्यक असतं. जर अन्नपचन व्यवस्थित झालं नाही तर गॅस, अॅसिडिटी, बद्धकोष्ठता, पोटदुखी, अशी वेगवेगळी दुखणी उद्भवतात. यासाठी घायपातची पानं फायदेशीर ठरतात. ही पानं कापून त्यांचा रस काढून पाण्यात मिसळून हे पाणी उकळवून दररोज सकाळी उपाशीपोटी प्यायल्यास पचनसंस्था भक्कम होते आणि पोटासंबंधातील विकार दूर होतात, असं डॉक्टर सांगतात.
जखम भरते : घायपातमध्ये अँटिसेप्टिक गुणधर्म असतात. ज्यामुळे शरिरावर आलेली कोणतीही जखम या वनस्पतीमुळे भरून निघते. शिवाय त्वचेसंबंधित इतर आजारही दूर होण्यास मदत मिळते.
डोकेदुखीवर रामबाण : घायपात वनस्पती शीत असते, त्यामुळे डोकेदुखीवर प्रभावी ठरते. त्यासाठी या वनस्पतीच्या ताज्या पानांचा रस काढून कपाळावर मालिश करण्याचा सल्ला दिला जातो.
सूज ओसरते : घायपातच्या पानांमध्ये अँटिइंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. ज्यामुळे शरिरावर कुठेही आलेली सूज ओसरण्यास मदत मिळेल. यासाठी घायपातची पानं वाटून सूज आलेल्या भागावर लावण्याचा सल्ला दिला जातो.
सूचना : इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. तरी आपण आपल्या आरोग्याबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी स्वतः डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कोणत्याही नुकसानासाठी न्यूज18 मराठी जबाबदार नसेल.