या वेदना कमी करण्यासाठी घरातील काही गोष्टी मासिक पाळीच्या वेदना कमी करण्यासाठी प्रभावी आहेत.
मेथीचं पाणी -
मासिक पाळीच्या वेदना कमी करण्यासाठी मेथीचे दाणे उपयुक्त ठरतात. रात्री एक चमचा मेथी दाणे भिजवून दुसऱ्या दिवशी हे पाणी प्यावं. यामुळे वेदनांपासून आराम मिळू शकतो. तुम्हाला हवं असल्यास पाण्यात मेथीचे दाणे टाकून ते उकळवून प्यावं.
advertisement
Immunity : रोगप्रतिकारक शक्ती वाढवा, आजारांना दूर पळवा, तंदुरुस्त राहा
बदाम
बदामामध्ये मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असतात. बदामामध्ये असलेले मॅग्नेशियम स्नायूंना आराम देण्यास मदत करतात. यामुळे मासिक पाळीच्या वेदना कमी होऊ लागतात. त्याचबरोबर मॅग्नेशियममुळे चांगली झोप लागते.
ओवा
ओवा हा स्वयंपाकघरातील मसाला पोटाच्या समस्या दूर करण्यासाठी गुणकारी आहे. पाळीतल्या वेदना कमी करण्यासाठी थोडा ओवा भाजून खा किंवा एक ग्लास पाण्यात एक चमचा ओव्याचे दाणे टाकून ते उकळून प्यायल्यानं वेदना कमी होण्यास मदत होते.
Dandruff : हिवाळ्यात कोंडा कसा कराल कमी ? खोबरेल तेल वापरा, केस दिसतील मुलायम
आल्याचा चहा
मासिक पाळीतल्या वेदना कमी करण्यासाठी आल्याच्या चहाचा चांगला परिणाम होतो. आल्यामध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात आणि त्यामुळे वेदनांमधून आराम मिळतो.
हे उपाय नक्की करुन बघा, काळजी घ्या !