म्हणून, जेव्हा टाचांमध्ये भेगा होतात तेव्हाच त्यांच्यासाठी उपाय योजले पाहिजेत. टाचांची समस्या घरच्या घरी सहज दूर होऊ शकते. या घरगुती उपायांसाठी लागणारे साहित्य घरच्या स्वयंपाकघरातच उपलब्ध आहे.
टाचांना तडे जात असतील तर कोमट पाणी वापरा. या पाण्यात मीठ मिसळा. लिंबाच्या रसाचे काही थेंब घाला. रात्री झोपण्यापूर्वी या पाण्यात 15 मिनिटं पाय भिजवून बसा. जेव्हा पाय पूर्णपणे पाण्यात भिजून मऊ होतात, तेव्हा पायाच्या स्क्रबरने हळूहळू टाच स्वच्छ करा. मग फूट क्रीम लावा आणि मग झोपा.
advertisement
New Year Resolutions : नवं वर्ष, नवे संकल्प, शरीर आणि मनाच्या आरोग्याची घ्या काळजी
घरातील या 10 गोष्टींमुळे टाचांच्या भेगा होतील बऱ्या
- टाचांना तडे जात असतील तर कोमट पाण्याचा वापर करा. या पाण्यात मीठ मिसळा. लिंबाच्या रसाचे काही थेंब घाला. रात्री झोपण्यापूर्वी या पाण्यात 15 मिनिटं पाय भिजवून बसा. जेव्हा पाय पूर्णपणे पाण्यात भिजून मऊ होतात, तेव्हा पायाच्या स्क्रबरने हळूहळू टाच स्वच्छ करा. मग फूट क्रीम लावा आणि झोपायला जा.
- रोज रात्री झोपण्यापूर्वी कडुलिंबाच्या तेलात ग्लिसरीन मिसळून टाचांच्या फोडी लवकर बऱ्या होतात.
- रात्री झोपण्यापूर्वी टाच स्वच्छ करून त्यावर खोबरेल तेल लावल्याने फायदा होतो.
- तांदळाच्या पिठात अर्ध्या लिंबाचा रस मिसळा. हे स्क्रब तयार करेल. या स्क्रबने डेड स्किन निघून जाईल.
- पाणी कोमट गरम करा. त्यात 2 चमचे मध मिसळा आणि 15 मिनिटं पाय भिजवा. पाय स्वच्छ केल्यानंतर, झोपण्यापूर्वी क्रीम लावा.
- रोज रात्री झोपण्यापूर्वी ताजी कोरफडीची फोड फुटलेल्या टाचांवर लावा.
- ग्लिसरीन आणि गुलाबजल समान प्रमाणात घ्या. रात्री पाय स्वच्छ करून त्यावर हे मिश्रण लावा. रात्रभर हे मिश्रण तसंच राहू द्या.
- पाणी कोमट करा. त्यात मीठ आणि व्हिनेगर मिसळा. या पाण्यात पाय 10 मिनिटं ठेवा. आता तुमचे पाय मऊ टॉवेलनं स्वच्छ करा आणि त्यावर फूट क्रीम लावा.
- एका भांड्यात एक चमचा ग्लिसरीन घ्या. त्यात तीन चमचे गुलाबजल टाका. प्रथम टाच स्वच्छ करा आणि नंतर या मिश्रणानं मालिश करा.
Acidity : ही पथ्यं पाळा, ॲसिडिटीला करा बाय - बाय, पचनसंस्था राहिल निरोगी
फुटलेल्या टाचांसाठी घरीच बनवा पायांचा पॅक
फूट पॅक घरीच बनवल्यानं टाचांच्या भेगांपासून लवकर आराम मिळतो. जर तुम्ही हा पॅक आठवड्यातून दोनदा लावलात तर तुमची टाच पूर्वीसारखीच होण्यासाठी मदत होईल.
पॅक बनवण्यासाठी दोन गोष्टी आवश्यक आहेत - केळी आणि मध. पिकलेलं केळ घेऊन ते चांगले मॅश करा. त्यात दोन चमचे मध मिसळा. हे मिश्रण भेगांवर लावा आणि 20 मिनिटं राहू द्या. नंतर आपल्या टाचा कोमट पाण्यानं धुवा, त्यावर क्रीम लावून झोपा.
घोट्यांना मालिश -
मसाज केल्यानं टाचा लवकर बऱ्या होतात. यामुळे टाचांवरच्या भेगा कमी होतात तसंच ज्यांना तणाव, निद्रानाश इत्यादी समस्या आहेत त्यांना आराम मिळतो. मसाजसाठी तुम्ही मोहरी, नारळ, बदाम, ऑलिव्ह किंवा एरंडेल तेल वापरू शकता. चांगल्या परिणामांसाठी, दररोज झोपण्यापूर्वी पायांना तेलानं मालिश करावं.