Acidity : ही पथ्यं पाळा, ॲसिडिटीला करा बाय - बाय, पचनसंस्था राहिल निरोगी
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
चुकीच्या खाण्याच्या सवयी, तणाव किंवा अवेळी खाणं अशा अनेक कारणांमुळे ॲसिडिटीचा त्रास जाणवतो. पण चांगली गोष्ट अशी की, ॲसिडिटीवर नियंत्रण ठेवण्यासाठी काही सोपे उपाय करुन पाहता येतील.
मुंबई : अनेकांना गॅस-ॲसिडिटीचा त्रास वारंवार जाणवतो. तुम्हालाही ॲसिडिटीचा त्रास होत असेल, तर रोज काही गोष्टी केल्या तर तुम्हाला ही समस्या जाणवणार नाही. यातली सर्वात चांगली गोष्ट म्हणजे ॲसिडिटीच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी काही सोपे घरगुती उपाय आहेत, ज्यामुळे तुमचा त्रास हळूहळू कमी होईल.
चुकीच्या खाण्याच्या सवयी, तणाव किंवा अवेळी खाणं अशा अनेक कारणांमुळे ॲसिडिटीचा त्रास जाणवतो. पण चांगली गोष्ट अशी की, ॲसिडिटीवर नियंत्रण ठेवण्यासाठी काही सोपे उपाय आहेत, ज्याचा अवलंब करून तुम्ही गॅसशी संबंधित समस्यांपासून मुक्त होऊ शकता.
गॅसच्या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी काय करता येईल ?
advertisement
कोमट पाणी :
गॅसची समस्या गरम पाण्यानं नियंत्रित केली जाऊ शकते. तुम्ही रोज सकाळी रिकाम्या पोटी १ ग्लास कोमट पाणी प्या. यामुळे तुमचं पोट स्वच्छ राहतं आणि चयापचय क्रिया देखील चांगली राहते.
आलं आणि मध :
advertisement
आलं आणि मध खाल्ल्यामुळे गॅसशी संबंधित समस्यांपासूनही आराम मिळू शकतो. यासाठी कोमट पाण्यात आलं आणि मध यांचा एक छोटा तुकडा मिसळा आणि दररोज खा. आल्यातील दाहक-विरोधी गुणधर्मामुळे गॅसची समस्या कमी होईल.
तूप आणि हळद :
तूप आणि हळदीमुळे तुमच्या गॅसशी संबंधित समस्याही कमी होऊ शकतात. तुम्ही फक्त एक चमचा तुपात अर्धा चमचा हळद मिसळून ते खाण्यापूर्वी घेऊ शकता. यामुळे पचनक्रिया सुधारते आणि गॅसची समस्या कमी होते. गॅसच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी अन्न खाल्ल्यानंतर काही वेळ फिरायला हवं. त्यानंतर 30 मिनिटांनी पाणी प्या. यामुळे गॅसचा त्रास होणार नाही.
advertisement
ही पथ्यं पाळा, ॲसिडिटीला करा बाय - बाय -
- मसालेदार तळलेले अन्नपदार्थ, सोडा. यामुळे ॲसिडिटी वाढू शकते.
- ताण व्यवस्थापन - तणावाचं व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. कारण यामुळे तुम्हाला गॅस आणि ॲसिडिटीच्या समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. तणावाची पातळी कमी असेल तर पचनसंस्थाही निरोगी राहील.
- एकावेळी जास्त अन्न खाऊ नका, दिवसातून 3-4 वेळा विभागून खा. यामुळे पोटात जास्त प्रमाणात ॲसिड तयार होणार नाही आणि पचनास देखील मदत होईल.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
January 01, 2025 5:59 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Acidity : ही पथ्यं पाळा, ॲसिडिटीला करा बाय - बाय, पचनसंस्था राहिल निरोगी