Bones Health : हाडांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष नको, आतापासूनच करा आहारात बदल, या पदार्थांचा करा आहारात समावेश
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
अयोग्य आणि अपुरा आहार हे हाडं कमकुवत होण्याचं मुख्य कारण आहे. योग्य ती पोषक तत्व न मिळाल्यामुळे, हाडं कमकुवत होतात. त्यामुळे हाडांना आवश्यक खनिजं पुरवू शकतील अशा पदार्थांचा आहारात समावेश करण्याकडे लक्ष द्या.
मुंबई : अयोग्य आणि अपुरा आहार हे हाडं कमकुवत होण्याचं मुख्य कारण आहे. योग्य ती पोषक तत्व न मिळाल्यामुळे, हाडं कमकुवत होतात. त्यामुळे हाडांना आवश्यक खनिजं पुरवू शकतील अशा पदार्थांचा आहारात समावेश करण्याकडे लक्ष द्या.
हाडं मजबूत करण्यासाठी कोणत्या गोष्टींचा आहारात समावेश केला जाऊ शकतो. त्याची माहिती समजून घेऊया.
सुका मेवा - सुका मेवा ज्यात काजू, बदाम किंवा मनुका असे अनेक पर्याय आहेत, त्यातील कोरडं अंजीर हाडांच्या मजबुतीसाठी पूरक आहे. वाळलेल्या अंजीरात कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम, लोह, तांबं आणि फॉस्फरसचं प्रमाण चांगलं असतं. याशिवाय अंजीरामध्ये व्हिटॅमिन के, व्हिटॅमिन बी 6 आणि व्हिटॅमिन ए तसेच व्हिटॅमिन सी देखील असतं. हे सर्व घटक हाडं मजबूत करण्यासाठी प्रभावी आहेत.
advertisement
बदाम-
सुक्या मेव्यातील बदामही हाडांसाठी फायदेशीर आहे. बदामामध्ये कॅल्शियम असतं ज्यामुळे हाडं मजबूत होतात.
दूध -
कमकुवत हाडं मजबूत करण्यासाठी, इतर काही पदार्थ आहाराचा भाग बनवता येईल. दुधात कॅल्शियम भरपूर असतं आणि त्यात व्हिटॅमिन डी देखील चांगलं असतं. दुध पिण्याचा हाडांना फायदा होतो.
advertisement
फरस्बी -
मजबूत हाडांसाठी बीन्स देखील आहाराचा भाग बनवता येतात. फरस्बीमध्ये जीवनसत्त्वं, लोह, मॅग्नेशियम आणि झिंक हे घटक चांगल्या प्रमाणात असतात.
टोफू -
शाकाहारी लोक त्यांच्या आहारात टोफू खाऊ शकतात. टोफूपासून शरीराला भरपूर कॅल्शियम मिळतं.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 31, 2024 7:12 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Bones Health : हाडांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष नको, आतापासूनच करा आहारात बदल, या पदार्थांचा करा आहारात समावेश