Juices for Sugar Control: हे ज्यूस प्या, रक्तातील साखर ठेवा नियंत्रणात, मधुमेहाचा त्रास होईल कमी

Last Updated:

Best Juices for Sugar Control: पालक, कारलं, आवळा, शेवग्याची पानं या सगळ्याचा रस मधुमेह नियंत्रणासाठी उपयुक्त आहे. या सर्व भाज्यांमधले औषधी गुणधर्म साखर नियंत्रणात महत्त्वाची भूमिका बजावतात.

News18
News18
मुंबई: मधुमेहाचं प्रमाण वाढतंय, जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये बदल करून यावर बऱ्याच प्रमाणात नियंत्रण ठेवता येतं. यासाठी आणखी काही घरगुती पर्याय..पालक, कारलं, आवळा, शेवग्याची पानं या सगळ्याचा रस मधुमेह नियंत्रणासाठी उपयुक्त आहे. या सर्व भाज्यांमधले औषधी गुणधर्म साखर नियंत्रणात महत्त्वाची भूमिका बजावतात.
अनेक पदार्थ मधुमेहींसाठी प्रतिबंधित आहेत. पण असे अनेक अन्न घटक आहेत, जे मधुमेहींसाठी महत्त्वाचे आहेत.स्वादुपिंड पुरेसं इन्सुलिन तयार करत नाही, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढते. साखरेवर वेळीच नियंत्रण ठेवलं नाही तर अनेक आजारांचा धोका वाढतो. जाणून घेऊया मधुमेहामध्ये साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी कोणतं ज्यूस प्यावं.
advertisement
पालकाचा रस मधुमेहामध्ये खूप फायदेशीर मानला जातो. पालकामध्ये जीवनसत्त्वं आणि खनिजं रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करतात.

2. आवळा रस

आवळा चवीसाठी प्रसिद्ध आहेच पण आवळा म्हणजे आरोग्याचा खजिना मानला जातो. आवळ्यामध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि हायपोग्लाइसेमिक गुणधर्म असतात ज्यामुळे रक्तातील साखर कमी होते. मधुमेही रुग्ण सकाळी रिकाम्या पोटी आवळ्याचा रस पिऊ शकतात.
advertisement
साखर नियंत्रित करण्यासाठी शेवग्याच्या शेंगांचा वापर केला जातो. शेंगांचा रस पिऊन रक्तातील साखरेची पातळी सहज नियंत्रित केली जाऊ शकते.

4. कारल्याचा रस

कारल्याची भाजी आहे जी फार कमी लोकांना खायला आवडते. पण मधुमेहाच्या रुग्णांसाठी कारलं खूप फायदेशीर मानलं जातं. दररोज सकाळी अर्धा कप कारल्याचा रस प्यायल्यानं रक्तातील साखर नियंत्रित राहण्यास मदत होते.
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Juices for Sugar Control: हे ज्यूस प्या, रक्तातील साखर ठेवा नियंत्रणात, मधुमेहाचा त्रास होईल कमी
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement