यापैकी एक म्हणजे केस गळण्याची समस्या. पीसीओएसमध्ये हार्मोनल बदलांमुळे महिलांचे केस गळायला सुरुवात होते, केस पातळ होतात किंवा समोरच्या भागात पातळ होतात.
पण, निरोगी जीवनशैली आणि योग्य आहारानं ही समस्या बऱ्याच प्रमाणात बरी होऊ शकते. या संदर्भात प्रसिद्ध पोषणतज्ज्ञ लिमा महाजन यांनी त्यांच्या इंस्टाग्राम हँडलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे.
advertisement
Intestines : आतडी मजबूत करण्यासाठी पाच घरगुती रामबाण उपाय, ही माहिती नक्की वाचा
या व्हिडिओत, PCOS मुळे केस गळती रोखण्यासाठी एक प्रभावी घरगुती उपाय त्यांनी शेअर केला आहे. PCOS किंवा हार्मोनल बदलांमुळे केसांची समस्या कमी करण्यासाठी, आहारात दोन बियांचा समावेश करू शकता.
यासाठी, एक चमचा मेथीचे दाणे रात्रभर पाण्यात भिजत ठेवा. दुसऱ्या दिवशी सकाळी रिकाम्या पोटी हे पाणी प्या आणि बिया चावा. यामुळे हार्मोन्स संतुलित राहतात आणि केसांची वाढ सुधारते.
एक चमचा जवस थोडे भाजून त्याची पावडर बनवा. ते दही, ओट्स किंवा स्मूदीमध्ये मिसळा आणि दररोज खा. जवसमध्ये ओमेगा-3 फॅटी एसिड असतं जे टाळूला पोषण देतं आणि केस गळणं कमी करतं.
पीसीओएस व्यतिरिक्त, लिमा महाजन यांनी केसांची काळजी घेण्यासाठी काही इतर उपाय सुचवले आहेत.
केस लोहाच्या कमतरतेमुळे गळत असतील, तर या आहारात मनुका, मोरिंगा पावडर आणि कढीपत्त्याचा समावेश करा.
Pimples : चेहऱ्याची अशी घ्या काळजी, नैसर्गिक फेसपॅकनं चेहऱ्याची चमक राहिल कायम
केस वारंवार तुटत असतील आणि पांढरे होत असतील तर दररोज काळे तीळ खाण्याची शिफारस त्यांनी केली आहे. केसांच्या वाढीसाठी बीट किंवा डाळिंब खा. पातळ आणि कमकुवत केसांसाठी आवळा खा.
हे सर्व उपाय नैसर्गिक आहेत आणि शरीराला आतून बरं करतात. यासोबतच, जीवनशैलीत योग्य बदल आणि आहार योग्य असेल तर काही आठवड्यांत फरक दिसेल.
