TRENDING:

Hair Care : उन्हाळ्यात जपा केसांचं आरोग्य, कोरडेपणा रोखण्यासाठी बनवा घरगुती हेअर मास्क

Last Updated:

उन्हाळ्यात केसांच्या अनेक समस्या जाणवतात. यातली एक मुख्य समस्या म्हणजे केस जास्त कोरडे होणं. कोरड्या केसांवर हेअर मास्क हा चांगला उपाय आहे. हे हेअर मास्क केसांना आवश्यक आर्द्रता देतात, केस मऊ करतात आणि केसांची चमक कायम राखतात. दह्याबरोबरच स्वयंपाकघरातील इतरही अनेक पदार्थ आहेत केसांचा कोरडेपणा दूर करतात.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : उन्हाळ्याचा कडाका वाढायला सुरुवात झाली की केस कोरडे होण्यास सुरुवात होते. उन्हाळ्यात कोरडे होणाऱ्या केसांसाठी दही, अंड, मध, नारळाचं तेल फायदेशीर ठरु शकतं. यामुळे केस मऊ होतील.
News18
News18
advertisement

उन्हाळ्यात केसांच्या अनेक समस्या जाणवतात. यातली एक मुख्य समस्या म्हणजे केस जास्त कोरडे होणं. कोरड्या केसांवर हेअर मास्क हा चांगला उपाय आहे. हे हेअर मास्क केसांना आवश्यक आर्द्रता देतात, केस मऊ करतात आणि केसांची चमक कायम राखतात. दह्याबरोबरच स्वयंपाकघरातील इतरही अनेक पदार्थ आहेत केसांचा कोरडेपणा दूर करतात.

बनाना हेअर मास्क

advertisement

बनाना हेअर मास्क बनवण्यासाठी एक केळं कुस्करुन त्यात एक चमचा मध आणि एक चमचा खोबरेल तेल घाला आणि चांगलं मिसळा. हा हेअर मास्क केसांना मुळापासून शेवटपर्यंत लावा आणि नंतर धुवा. हा हेअर मास्क खराब झालेले केस दुरुस्त करण्यासाठी प्रभावी आहे.

Belly Fat : पोटावरचा घेर कमी करण्यासाठी टिप्स, ही फळं खाल्ल्याचा होईल फायदा

advertisement

एग हेअर मास्क

एग हेअर मास्कमुळे केसांना मुबलक प्रमाणात प्रथिनं मिळतात. ज्यामुळे केसांचा कोरडेपणा कमी होतो आणि केस निरोगी होतात. हा हेअर मास्क बनवण्यासाठी एका अंड्यामध्ये लिंबाचा रस आणि ऑलिव्ह ऑईल मिसळा. एक चमचा दही घाला. आता हे मिश्रण केसांना लावा आणि अर्धा तास ठेवा आणि नंतर केस धुवा. यामुळे केसांना चमक येते.

advertisement

दही आणि मध

कोरड्या केसांना हायड्रेशन देण्यासाठी, दही आणि मधाचा हेअर मास्क लावला जाऊ शकतो. एक कप दह्यात २ चमचे मध घालून चांगलं मिसळा. हा हेअर मास्क केसांवर अर्धा तास ठेवा आणि नंतर धुवा. यामुळे केसांना ओलावा तर मिळतोच, पण टाळूवर साचलेली धूळही निघते.

Brain Power : मेंदूला अलर्ट ठेवण्यासाठी हे नक्की करा, स्मरणशक्तीसाठी उपयुक्त व्यायाम

advertisement

ऑलिव्ह ऑईल आणि नारळ तेल

खराब झालेल्या केसांच्या पोषणासाठी, ऑलिव्ह ऑईल आणि खोबरेल तेल सम प्रमाणात मिसळा. हे मिश्रण थोडं गरम करून केसांना लावा, तासभर ठेवा आणि नंतर धुवा. केसांचा कोरडेपणा कमी होईल. आठवड्यातून 2-3 वेळा या तेलानं डोक्याला मालिश करता येतं.

दही आणि दालचिनी

दही आणि दालचिनी वापरुन तयार केलेला हेअर मास्क कोरड्या केसांसाठी खूप फायदेशीर आहे. हा हेअर मास्क बनवण्यासाठी एक चमचा दालचिनी पावडरमध्ये 3 ते 4 चमचे दही मिसळून हेअर मास्क बनवा. मास्क केसांना लावा आणि पंधरा मिनिटांनी केस धुवा. या हेअर मास्कमुळे केस चांगले स्वच्छ होतात आणि केस वाढण्यासाठीही मदत होते.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Hair Care : उन्हाळ्यात जपा केसांचं आरोग्य, कोरडेपणा रोखण्यासाठी बनवा घरगुती हेअर मास्क
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल