डॉ. अनुराधा टाकरखेडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्वचा ही तीन प्रकारची असते. ड्राय स्किन, ऑईली स्किन आणि कॉम्बिनेशन स्किन हे त्वचेचे मुख्य तीन प्रकार आहेत. इतर जे असतात ते त्वचा प्रकार नाहीत. जसे की, सेन्सिटिव्ह स्किन हा त्वचा प्रकार नाही. कोणतीही स्किन सेन्सिटिव्ह असू शकते. तर आता आपली त्वचा नेमकी कोणती? ते कसं ओळखायचं? तर त्यासाठी सर्वात आधी तुम्ही वापरत असाल अशा फेसवॉशने चेहरा धुवायचा. त्यानंतर कोरड्या कापडाने चेहरा पुसून घ्यायचा. चेहरा पुसल्यानंतर 1 तास त्यावर काहीही लावू नका. 1 तासानंतर तुम्हाला तुमचा त्वचा प्रकार लक्षात येईल.
advertisement
ड्राय स्किन
1 तासानंतर जेव्हा तुम्ही बघाल, तेव्हा तुमची त्वचा जर ड्राय असेल, तर पूर्णतः कडकडीत चेहरा होईल. त्याला खाज सुटेल. अगदी पांढरी खपली सुद्धा निघू शकते. तेव्हा समजायचं की, तुमची त्वचा कोरडी आहे.
ऑईली स्किन
जर 1 तासानंतर तुमच्या चेहऱ्यावर पूर्ण ऑईल आलं असेल. अगदी हाताला लागेल असेल. तर तुमची त्वचा ऑईली आहे.
कॉम्बिनेशन स्किन
त्यानंतर कपाळ आणि नाक हे तेलकट झालं असेल आणि गाल, हनुवटी हे कोरडे असेल, तर तुमचा स्किन टाईप हा कॉम्बिनेशन स्किन टाईप आहे. अशाप्रकारे तुम्ही तुमचा स्किन टाईप ओळखू शकता. त्यानुसार डॉक्टरांच्या सल्ल्याने प्रॉडक्ट घेऊन त्वचेची काळजी सुद्धा घेऊ शकता. बाजारातील कोणतेही प्रॉडक्ट माहिती न घेता वापरल्यास त्वचेला हानी पोहोचू शकते. त्यामुळे काळजी घेणे गरजेचे आहे.





