बाहेर पडताना गरम कपडे
हिवाळ्याच्या ऋतूमध्ये कडाक्याची थंडी असते. त्यामुळे वृद्धांनी स्वतःचा बचाव करण्यासाठी जास्तीत जास्त गरम कपडे, स्वेटर, पाय आणि हातमोजे, टोपीचा वापर करावा. अनेकांना मॉर्निंग वॉकची सवय असते. मात्र थंडीच्या दिवसात पहाटे बाहेर पडणे शक्यतो टाळावे किंवा गेलातच तर गरम कपडे घालणं गरजेचं आहे, असे डॉक्टर सांगतात.
छातीत जळजळ होतेय? आरोग्याचा हा घरगुती मंत्र देईल आराम, Video
advertisement
आहारात गरम पदार्थांचे सेवन
हिवाळ्याच्या दिवसांमध्ये आहारात गरम पदार्थांचे सेवन करा. जेणेकरून शरीरातील आंतरिक तापमान हे संतुलित राहण्यास मदत होईल. तिळाचे सेवन, गुळाचे सेवन, सुकामेवा आणि सोबतच बाजरीची भाकर अशा प्रकारच्या गरम पदार्थांचे सेवन केल्यास शरीरातील तापमान योग्य राहील. तसेच रक्त गोठण्याच्या समस्ये पासूनही बचाव होऊ शकतो. सोबतच चांगले आरोग्यासाठी हिरव्या पालेभाज्या खाणंही महत्त्वाचं असल्याचं डॉक्टर गांडोळे यांनी सांगितलं.
वेळेवर औषधी आणि त्वचेची काळजी
हिवाळ्यामध्ये जेवण केल्यावर किंवा जेवणाच्या आधीच्या आपल्या ज्या नेहमीच्या औषधी असतील तर त्याही वेळेत घेणं गरजेचं आहे. सोबतच त्वचेची काळजी ही महत्त्वाची ठरते. कारण वृद्धांची त्वचा आधीच कोरडी आणि सुरकुत्या पडलेली असते. त्यामुळे हिवाळ्यामध्ये त्वचेची काळजी जास्त घ्यावी लागेल. त्वचेवर व्यासलीन किंवा चांगलं मॉइश्चरायझर लावावं. त्या व्यतिरिक्त मोहरीचं तेल तुम्ही त्वचेवर लावू शकता. जेणेकरून त्वचा कोरडी पडणार नाही. भरपूर पाणी पिण्याचा सल्लाही डॉक्टर देतात.
हिवाळ्यात मेकअप करताना काय काळजी घ्यावी? जाणून घ्या सौंदर्य तज्ज्ञांचा सल्ला
या रुग्णांनी धुक्यात जाणे टाळा
हिवाळ्याच्या दिवसांमध्ये अनेकदा धुके पडलेले दिसते. तर अशा वातावरणात श्वसनाचे आजार किंवा अस्थमाच्या रुग्णांनी बाहेर पडणे टाळावे. विशेषतः पहाटेच्या दरम्यान असलेल्या थंडीत अस्थमाचे रुग्णांनी बाहेर जाणे टाळलेले बरे. बाहेर गेल्यास हातमोजे, पाय मोजे, स्वेटर, कान टोपी आणि बूट घालून बाहेर जावे. जेणेकरून श्वसन प्रक्रियेला काही त्रास होणार नाही. सोबतच सर्व व्यक्तींनी आंघोळीच्या पाण्यात तीळ टाकले तर त्वचेची स्निग्धता टिकून राहील, असेही डॉक्टरांनी सांगितलं.
रात्री आणि पहाटेच्या दरम्यान तापमानात चांगलीच घट झालेली दिसून येते. ही थंडी वृद्धांना अनेकदा सहन होत नाही. त्यामुळे हृदयविकार किंवा पॅरलिसीस म्हणजेच लकवा यासारखे परिणाम जास्त दिसून येतात. यापासून वृद्धांनी स्वतःला वाचवून योग्य संतुलित आहार, योग्य वेळी औषधी, गरम कपड्यांचा वापर, भरपूर पाणी पिणे तसेच डॉक्टरांनी सांगितलेल्या गोष्टींचा आहारात समावेश करणे महत्त्वाचे ठरते.





