छत्रपती संभाजीनगर : गर्भवती माता आणि त्यांच्या नवजात बालकांचे तसेच स्तनदा मातेचे आरोग्य सुधारावे आणि त्यांना सकस पोषण आहार मिळून त्यांच्या आरोग्यात सुधारणा व्हावी, या हेतूने राज्यात गेली अनेक वर्ष प्रधानमंत्री मातृवंदना योजना राबविण्यात येत आहे. तर या योजनेचा तुम्ही कशा पद्धतीने लाभ घेऊ शकतात? तुम्हाला योजनेचा लाभ मिळविण्यासाठी काय कागदपत्रे लागतात? याबाबतच छत्रपती संभाजीनगर येथील जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर यांनी माहिती दिली आहे.
advertisement
केंद्र सरकारकडून ज्या गर्भवती महिला आहेत किंवा ज्या महिलांनी नुकताच बाळांना जन्म दिला आहे तर अशा महिलांसाठी ही प्रधानमंत्री मातृवंदना योजना राबविण्यात येत आहे. ज्या गर्भवती महिला आहेत त्यांना पहिला मुलगा असेल किंवा मुलगी असेल अशा माता याचा लाभ घेऊ शकतात. तर शासनाकडून प्रत्येक मातेला 5 हजार रुपये आर्थिक सहाय्य केले जाते. यासाठी त्यांनी तीन महिने अगोदर रजिस्ट्रेशन करणे गरजेचे आहे.
एक डॉक्युमेंट नसेल तर खात्यावर येणार नाहीत 1400 रुपये, काय आहे केंद्र सरकारची ‘जननी सुरक्षा योजना’?
तसेच एएनसीची त्यांची जी व्हिजिट आहे ती असणे गरजेचे आहे. त्याचबरोबर त्यांची जी प्रसूती आहे ती शासकीय रुग्णालयामध्ये किंवा कोणत्या रुग्णालयामध्ये त्यांची प्रसूती झालेली असावी. बाळाचे किमान साडेतीन महिन्यांचे लसीकरण पूर्ण झालेले असावे. अशा सर्व क्रायटेरियामध्ये जर रजिस्ट्रेशन केलेले असेल तर मातेला पहिल्या अपत्यासाठी 5 हजार रुपये हे दिले जातात, असं जिल्हा आरोग्य अधिकारी सांगतात.
रजिस्ट्रेशन तुम्ही आशा सेविका त्यासोबत अंगणवाडी सेविका किंवा प्रत्येक शासकीय दवाखान्यांमध्ये करू शकतात. गेल्या दोन वर्षांपासून शासनाने याच्यामध्ये अजून एक नियम ऍड केलेला आहे तो म्हणजे जर मुलीला दुसरे अपत्य असेल आणि ते जर मुलगी असेल तर अशांना देखील आर्थिक सहाय्य म्हणून 6 हजार रुपये मदत केली जाते. यासाठी मातेच्या वयाचा दाखला लागतो. मातेचे वय हे 19 वर्षे पूर्ण असावे. आधार कार्ड लागते आणि त्यासोबतच बँकेचे डिटेल्स लागतात.
या योजनेसाठी तुम्ही रजिस्ट्रेशन केले तेव्हा मातेला 1 हजार रुपये दिले जातात. त्यानंतर जर बाळाचा जन्म हा शासकीय रुग्णालयात झाला तर 2 हजार रुपये आणि बाळाचे साडेतीन महिन्यांचे लसीकरण पूर्ण झाले असेल तर 2 हजार रुपये दिले जातात. अशा पद्धतीने हे पैसे मातांना दिले जातात ते याकरता की मातेचे आणि बाळाचे आरोग्य हे सुदृढ राहावे आणि त्यांना योग्य तो आहार मिळावा. तर जास्तीत जास्त मातांनी याचा फायदा घ्यावा. आपले आणि बाळाचे आरोग्य कसे सुदृढ राहील यासाठी आपण प्रयत्न करावेत जेणेकरून तुम्हाला या योजनेचा लाभ होईल, असे आवाहन देखील डॉ. धानोरकर यांनी केले आहे.





