TRENDING:

Anant Chaturdashi 2025: गणपती विसर्जन मिरवणुकीत गुलालापासून संरक्षण कसे कराल? डोळ्यांमध्ये गेल्यास लगेच करा हे 4 उपाय, VIdeo

Last Updated:

विसर्जन मिरवणुकीत जास्तीत जास्त गुलालाची उधळण होत असते. गुलाल डोळ्यांत गेल्यास अनेक वेळा डोळ्यांचे संक्रमण, दुखापत आणि दृष्टीस धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे गुलाल डोळ्यात जाऊ नये यासाठी काळजी घेणे गरजेचे आहे. 

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
अमरावती: गणेशोत्सवाच्या काळात जल्लोष, मिरवणुका, आरत्या आणि उत्साह यामध्ये भरपूर प्रमाणात गुलालाची उधळण होत असते. पण, गुलालाच्या या उधळणीत जर डोळ्यांची काळजी घेतली नाही, तर हा गुलाल डोळ्यांसाठी अतिशय घातक ठरू शकतो. विशेषतः विसर्जन मिरवणुकीत जास्तीत जास्त गुलालाची उधळण होत असते. गुलाल डोळ्यांत गेल्यास अनेक वेळा डोळ्यांचे संक्रमण, दुखापत आणि दृष्टीस धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे गुलाल डोळ्यात जाऊ नये यासाठी काळजी घेणे गरजेचे आहे. गुलाल डोळ्यात गेल्यास काय त्रास होऊ शकतो? याबाबत माहिती नेत्रतज्ज्ञ डॉ. राजोरिया यांनी दिली.
advertisement

डोळ्यांमध्ये गुलाल गेल्यास काय त्रास होऊ शकतो?

नेत्रतज्ज्ञ डॉ. राजोरिया सांगतात की, डोळ्यात गुलाल गेल्यास जळजळ आणि लालसरपणा जाणवू शकतो. गुलालात असलेल्या कृत्रिम रंगांमुळे डोळ्यांची आतील त्वचा चिडते आणि डोळे लाल होतात. तसेच डोळ्यांतून पाणी येणे आणि खवखव सुद्धा जाणवू शकते. सूक्ष्म रसायनांमुळे डोळ्यांतून सतत पाणी येऊ शकते.

Mumbai Local: मुंबईकर गणेशभक्तांसाठी खूशखबर, तिन्ही मार्गावर धावणार जादा गाड्या, पाहा वेळापत्रक

advertisement

त्याचबरोबर डोळ्यात गुलाल गेल्यास अधू दिसणे ही समस्या देखील उद्भवू शकते. काही वेळा गुलालाचे बारीक कण कॉर्नियावर बसल्यास दृष्टिदोष होऊ शकतो. कॉन्टॅक्ट लेन्स वापरणाऱ्यांसाठी धोका अधिक असतो.

गुलाल डोळ्यात गेल्यास कॉन्टॅक्ट लेन्स वापरणाऱ्यांसाठी धोका अधिक असतो. गुलाल डोळ्यात जाऊन लेन्स आणि डोळ्याच्या मधील अंतरात अडकतो, ज्यामुळे गंभीर इन्फेक्शन होऊ शकते.

advertisement

कॉनजंक्टिव्हायटीस (डोळ्यांची सूज) ही समस्या देखील उद्भवू शकते. केमिकल असणारा गुलाल डोळ्यांमध्ये संसर्ग निर्माण करू शकतो. त्याचबरोबर डोळ्यांच्या पडद्यावर कायमस्वरूपी इजा देखील होऊ शकते. दुर्लक्षित केल्यास हे परिणाम दीर्घकालीन ठरू शकतात, असे त्यांनी सांगितले.

गुलाल डोळ्यात गेल्यास काय करावं?

1. डोळे लगेच स्वच्छ, थंड पाण्याने धुवून घ्या. गरम पाणी अजिबात वापरू नका.

advertisement

2. डोळे चोळू नका. त्यामुळे जास्त इजा होऊ शकते.

3. स्वतः औषध न टाकता नेत्रतज्ज्ञांचा सल्ला घ्या.

4. जर डोळ्यात वेदना, धुंद दिसणं, डोळे मिटू न शकणं किंवा सूज जाणवत असेल, तर लगेच हॉस्पिटलमध्ये जाऊन उपचार घ्या.

गणपती उत्सवात डोळ्यांची काळजी कशी घ्याल?

1. डोळ्यांवर गॉगल्स वापरा.

2. लहान मुलांना आणि वृद्धांना मिरवणुकीत थेट गुलाल उधळण्यापासून वाचवा.

advertisement

3. शक्य असल्यास नैसर्गिक गुलाल वापरा. रासायनिक रंग टाळा.

4. डोळे संवेदनशील असणाऱ्यांनी शक्यतो गुलाल टाळावा.

5. कॉन्टॅक्ट लेन्स लावले असल्यास त्या मिरवणुकीपूर्वी काढा.

6. डोळ्यांना हात लावण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा, अशी माहिती नेत्रतज्ज्ञांनी दिली. ही सर्व काळजी घेतल्यास तुम्हाला इजा होण्यापासून वाचवू शकता.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Anant Chaturdashi 2025: गणपती विसर्जन मिरवणुकीत गुलालापासून संरक्षण कसे कराल? डोळ्यांमध्ये गेल्यास लगेच करा हे 4 उपाय, VIdeo
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल