advertisement

Mumbai Local: मुंबईकर गणेशभक्तांसाठी खूशखबर, तिन्ही मार्गावर धावणार जादा गाड्या, पाहा वेळापत्रक

Last Updated:

Mumbai Local: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील तिन्ही मार्गांवर जादा लोकल धावणार आहेत. या गाड्यांचं वेळापत्रक पाहू.

Mumbai Local: मुंबईकर गणेशभक्तांसाठी खूशखबर, तिन्ही मार्गावर धावणार जादा गाड्या, पाहा वेळापत्रक
Mumbai Local: मुंबईकर गणेशभक्तांसाठी खूशखबर, तिन्ही मार्गावर धावणार जादा गाड्या, पाहा वेळापत्रक
मुंबई: मुंबईकर गणेशभक्तांसाठी खूशखबर आहे. घरगुती आणि सात दिवसांच्या गणरायाच्या विसर्जनानंतर अनेकजण सार्वजनिक बाप्पांच्या दर्शनासाठी आणि देखावे पाहण्यासाठी बाहेर पडतात. त्यामुळे रस्त्यावर गर्दी होऊन वाहतूक कोंडी होते. याच पार्श्वभूमीवर मुंबईची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या लोकलच्या जादा फेऱ्या सोडण्यात येणार आहे. रेल्वे प्रशासनाने याबाबत निर्णय घेतला असून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि ठाणे / कल्याण या स्थानकांदरम्यान रात्रीच्या वेळेत 22 जादा तर पश्चिम रेल्वेवरही 12 जादा लोकल सोडण्यात येतील.
असं असेल वेळापत्रक
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी)-कल्याण विशेष लोकल सीएसएमटीहून रात्री 1 वाजून 40 मिनिटांनी सुटेल आणि कल्याणला रात्री 3 वाजून 10 मिनिटांनी पोहोचेल. सीएसएमटी- ठाणे जादा लोकल ही सीएसएमटीहून रात्री 2.30 वाजता सुटेल आणि रात्री 3 वाजून 30 मिनिटांनी पोहोचेल. तर, सीएसएमटी- कल्याण विशेष लोकल सीएसएमटीहून मध्यरात्र उलटून 3 वाजून 25 मिनिटांनी सूटन कल्याणला पहाटे 4.55 वाजता पोहोचेल.
advertisement
कल्याण सीएसएमटी विशेष लोकल कल्याणहून रात्री 12.5 ला निघून रात्री 1.30 वाजता सीएसएमटीला पोहोचेल. तर ठाणे - सीएसएमटी जादा गाडी ठाण्याहून रात्री 1 वाजता निघून आणि रात्री 2 वाजता सीएसएमटीला पोहोचेल. दुसरी ठाणे-सीएसएमटी विशेष लोकल ठाण्याहून रात्री 2 वाजता सुटून रात्री 3 वाजता सीएसएमटीला पोहोचेल.
advertisement
पश्चिम रेल्वेवर 12 विशेष लोकल
अनंत चतुर्दशीच्या दिवशी पश्चिम रेल्वेवरून रात्री 12 विशेष लोकल चालवण्यात येतील. शनिवारी मध्यरात्री आणि रविवारी पहाटेपर्यंत या लोकल उपलब्ध असतील. चचर्गेटहून विरारसाठी रात्री 1.15, 1.45, 2.15, 2.45, 3.15, 3.45 वाजता लोकल सुटतील. तर विरारहून चर्चगेटसाठी रात्री 12.15, 12.30, 1.00, 1.30, 2.00 आणि 3.00 वाजता सुटेल.
हार्बर रेल्वेवरून जादा गाड्या
अनंत चतुर्दशीच्या दिवशी हार्बर मार्ग देखील प्रवाशांच्या सोयीसाठी सज्ज राहणार आहे. अनंत चतुर्दशीच्या रात्री हार्बर रेल्वेवर 4 विशेष गाड्या चालवण्यात येतील.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai Local: मुंबईकर गणेशभक्तांसाठी खूशखबर, तिन्ही मार्गावर धावणार जादा गाड्या, पाहा वेळापत्रक
Next Article
advertisement
Shiv Sena UBT On Raj Thackeray : राज ठाकरेंकडून लवचिक धोरणाचे संकेत, ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया, ''ते एका राजकीय...''
राज ठाकरेंकडून लवचिक धोरणाचे संकेत, ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया, ''ते एका राजक
  • राज ठाकरे यांनी राजकीय लवचिकतेचे संकेत दिल्यानंतर मुंबईसह राज्यात एकच राजकीय चर्

  • राज ठाकरे यांनी लिहिलेल्या पोस्टवर शिवसेना ठाकरे गटाने आपली प्रतिक्रिया दिली

  • शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी त्यावर भाष्य केले आहे.

View All
advertisement