सगळ्यात पहिली महत्त्वाची टिप्स म्हणजे की तुम्ही दिवसातून दोन ते तीन वेळा चेहरा धुवावा. चेहरा धुताना तो तुमच्या चेहऱ्याला जे फेस वॉश सूट होतं त्या फेस वॉशने तुम्ही चेहरा धुवावा आणि प्रत्येक वेळेस चेहरा धुताना तुम्ही तो थंड किंवा कोमट पाण्याने धुवावा. यासाठी गरम पाण्याचा वापर करू नये. यामुळे तुमचा चेहरा चांगला राहतो आणि याच्यावरचं तेल देखील कमी होतं आणि चेहऱ्यावरचं अतिरिक्त तेल आणि जी धूळ आहे ती देखील निघून जाते. त्यानंतर तुम्ही अल्कोहोल फ्री टोनर वापरावे.
advertisement
Health Tips: स्मरणशक्ती वाढविते अन् पचन सुधारते, लहान मुलांना सुवर्ण प्राशन अतिशय फायदेशीर, Video
म्हणजेच तुमचा चेहरा यामुळे चांगला राहील आणि तसेच तुम्ही ऑइल बेस जे मॉइश्चरायझर असतात ते वापरावे. ऑइल बेस मॉइश्चरायझर तुम्ही वापरलं तर त्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर अतिरिक्त तेल कमी व्हायला मदत होते. त्यानंतर तुम्ही जास्त चेहऱ्यावर तुमच्या तेल येत असेल तर तुम्ही ब्लोटिंग पेपरचा देखील वापर करू शकता. हे तुमच्या चेहऱ्यावरचे अतिरिक्त तेल शोषून घ्यायला मदत करतं. त्यानंतर तुम्ही होम रेमेडीज देखील वापरू शकता.
तुम्ही घरच्या घरी फेस पॅक तयार करून तो लावू शकता. तुमच्या चेहऱ्याला जे सूट होतं ते स्क्रब तुम्ही दोन किंवा तीन वेळा वापरावं. तसंच एलोवेरा जेलचा वापर करावा. एलोवेरा जेल जर तुम्ही तुमच्या चेहऱ्याला लावलं तर यामुळे तुमच्या चेहऱ्यावरचे अतिरिक्त तेल आहे ते देखील यामुळे कमी होतं. या सर्व टिप्स जर तुम्ही फॉलो केल्या तर नक्कीच तुमचा चेहरा हा ग्लो करेल आणि एकदम नैसर्गिक चमक ही राहील. तर या सगळ्या टिप्स तुम्ही यासाठी फॉलो करू शकता.