TRENDING:

Fat Loss Tips : पोटाची चरबी कमी करण्यासाठी प्रभावी घरगुती उपाय, कच्ची हळद आणि काळी मिरीचं करा सेवन, पंधरा दिवसात दिसेल परिणाम

Last Updated:

पोट आणि मांडीवरची चरबी कमी करण्यासाठी जिम, डाएटिंग आणि महागड्या सप्लिमेंट्सची मदत घेतात. पण काही घरगुती उपाय करून पाहिले तर तुम्हाला लवकर परिणाम मिळू शकेल. 

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : बाहेर आलेल्या पोटापेक्षा फिट आणि टोन्ड बॉडी प्रत्येकाला आवडते. पण यासाठी करावे लागतात कष्ट.. पोट आणि मांडीवरची चरबी कमी करण्यासाठी जिम, डाएटिंग आणि महागड्या सप्लिमेंट्सची मदत घेतात. पण काही घरगुती उपाय करुन पाहिले तर तुम्हाला लवकर परिणाम मिळू शकेल.
News18
News18
advertisement

पोटावरची चरबी कमी करण्यासाठी काही घरगुती उपाय प्रभावी ठरु शकतात. वाढलेल्या पोटामुळे तुमच्या व्यक्तिमत्त्वावरच परिणाम होत नाही तर त्यामुळे अनेक आरोग्य समस्याही उद्भवू शकतात. आयुर्वेदात असे काही सोपे आणि प्रभावी उपाय आहेत जे कोणत्याही दुष्परिणामांशिवाय वजन कमी करण्यास मदत करू शकतात. यामध्ये कच्ची हळद, काळी मिरी आणि इतर नैसर्गिक गोष्टींचा समावेश आहे.

advertisement

Winter Face Pack : हिवाळ्यातही कायम राहिल चेहऱ्यावरचा ग्लो, घरी बनवता येईल फेस पॅक

कच्च्या हळदीमध्ये अँटी-इंफ्लेमेटरी, अँटीऑक्सिडंट आणि फॅट बर्निंग गुणधर्म आढळतात. यामध्ये असलेल्या      कर्क्युमिन नावाच्या घटकामुळे चयापचयाचा वेग गतिमान होते, ज्यामुळे शरीरात जमा झालेली चरबी वेगानं वितळते.

काळ्या मिरीमध्ये पिपेरिन नावाचं संयुग असतं, जे हळदीमध्ये असलेलं कर्क्यूमिन शरीरात चांगले शोषून घेण्यास मदत करतं आणि पचन सुधारण्यास आणि अतिरिक्त चरबी कमी करण्यास मदत करतं. त्यामुळे हे नैसर्गिक घटक असलेली कच्ची हळद आणि काळी मिरी वजन कमी करण्यासाठी हा एक सोपा आणि प्रभावी उपाय आहे.

advertisement

साहित्य:

1 टीस्पून किसलेली कच्ची हळद

अर्धा टीस्पून काळी मिरी पावडर

Kitchen Tips: धान्याला कीड लागली असेल तर या टिप्स वापरा, घरगुती - नैसर्गिक उपायांनी राहिल धान्य स्वच्छ

1 चमचा मध

1 ग्लास कोमट पाणी

कृती :

सर्वप्रथम कोमट पाण्यात कच्ची हळद आणि काळी मिरी पावडर मिसळा. त्यात मध घालून मिसळा. हे मिश्रण रोज सकाळी रिकाम्या पोटी प्या. हा उपाय नियमितपणे वापरला आणि त्यासोबत सकस आहार आणि हलका व्यायाम हे तुमच्या दिनचर्येचा भाग असतील तर लवकरच फरक जाणवू शकतो.

advertisement

या गोष्टी लक्षात ठेवा:

हळदीचे सेवन जास्त केल्यानं पचनाच्या समस्या निर्माण होतात.

तुम्हाला कोणत्याही पदार्थाची ऍलर्जी असेल तर त्याचं सेवन करु नका.

कोणताही घरगुती उपाय करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Fat Loss Tips : पोटाची चरबी कमी करण्यासाठी प्रभावी घरगुती उपाय, कच्ची हळद आणि काळी मिरीचं करा सेवन, पंधरा दिवसात दिसेल परिणाम
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल