Winter Face Pack : हिवाळ्यातही कायम राहिल चेहऱ्यावरचा ग्लो, घरी बनवता येईल फेस पॅक

Last Updated:

हिवाळ्यात त्वचा कोरडी होण्याचं प्रमाण वाढतं. हिवाळ्यातही त्वचा चमकदार राहण्यासाठी घरगुती फेस पॅक लावला तर त्वचेवर नैसर्गिक चमक येण्यास मदत होते.

News18
News18
मुंबई : हिवाळ्यात त्वचा कोरडी होण्याचं प्रमाण वाढतं. हिवाळ्यातही त्वचा चमकदार राहण्यासाठी घरगुती फेस पॅक लावला तर त्वचेवर नैसर्गिक चमक येण्यास मदत होते. कच्चं दूध, कॉफी, हळद, बेसन आणि नारळाच्या तेलानं बनवलेला हा फेस पॅक लावल्यानं नैसर्गिक चमक येईल. आठवड्यातून फक्त दोनदा हा फेसपॅक लावला तरीही तुमच्या त्वचेला नवीन चमक येऊ शकते.
या फेसपॅकसाठी कच्चं दूध, कॉफी, हळद, बेसन आणि नारळाच्या तेलाचा वापर करायचा. हा फेस पॅक हिवाळ्यात तुमच्या त्वचेला नैसर्गिक आर्द्रता देईल आणि त्वचा चमकदारही राहील. चला जाणून घेऊया हा फेस पॅक बनवण्याची आणि लावण्याची योग्य पद्धत.
साहित्य:
अर्धा कप कच्चं दूध
दोन चमचे कॉफी
advertisement
एक चिमूटभर हळद
दोन चमचे बेसन
एक टीस्पून नारळाचं तेल
फेस पॅक कसा बनवायचा?
कच्चं दूध आणि कॉफी मंद आचेवर उकळवा. त्यात हळद, बेसन आणि खोबरेल तेल एकत्र करून पेस्ट बनवा.
मिश्रण थंड होऊ द्या जेणेकरून ते चेहऱ्यावर सहज लावता येईल.
कसा वापरावा फेस पॅक ?
तयार केलेली पेस्ट चेहऱ्यावर फेसपॅकप्रमाणे लावा.
advertisement
15-20 मिनिटं कोरडी होऊ द्या.
पेस्ट कोरडी झाल्यानंतर कोमट पाण्यानं चेहरा धुवा.
धुतल्यानंतर चेहऱ्यावर हलकं मॉइश्चरायझर लावा.
आठवड्यातून दोनदा वापरा फेस पॅक
हा फेस पॅक आठवड्यातून दोनदा वापरा. यामुळे त्वचेची हरवलेली आर्द्रता तर परत येईलच पण हिवाळ्यात कोरडी आणि निस्तेज त्वचा देखील दुरुस्त होईल. कच्चं दूध आणि हळदीमुळे त्वचेला नैसर्गिक चमक मिळते. कॉफीमुळे त्वचेवरचे काळे डाग कमी होतात. बेसन म्हणजेच डाळीच्या पिठामुळे त्वचा उजळ आणि मऊ होते. खोबरेल तेल त्वचेला खोलवर हायड्रेट करते आणि कोरडेपणा दूर करते.
advertisement
हिवाळ्यात चेहऱ्यावरचा कोरडेपणा घालवण्यासाठी सोप्या घरगुती उपायाचा अवलंब करा. यामुळे तुमच्या त्वचेला नैसर्गिक चमक आणि ओलावा मिळेल.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Winter Face Pack : हिवाळ्यातही कायम राहिल चेहऱ्यावरचा ग्लो, घरी बनवता येईल फेस पॅक
Next Article
advertisement
BMC Election BJP : भाजपचा ‘३० मिनिट्स प्लॅन’! बंडखोरी रोखण्यासाठी शेवटच्या क्षणी असा टाकणार मोठा डाव
भाजपचा ‘३० मिनिट्स प्लॅन’! बंडखोरी रोखण्यासाठी शेवटच्या क्षणी असा टाकणार मोठा डा
  • महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आता शेवटचे काही तास शिल्लक राहिल

  • भाजपने बंडखोरांना चितपट करण्यासाठी ३० मिनिट्स प्लॅन तयार केला

  • संभाव्य बंडखोरीला आळा घालण्यासाठी पक्षाने ही नवी रणनिती आखल्याचे समोर आले आहे

View All
advertisement