TRENDING:

Winter Food : हिवाळ्यातल्या हंगामी भाज्या खा, तब्येत कमवा, आजार दूर पळवा

Last Updated:

हिवाळ्यात असे पदार्थ मिळतात ज्यात सामान्यत: व्हिटॅमिन सी आणि डी भरपूर प्रमाणात असतं. सर्दी आणि तापासारख्या संसर्गापासून संरक्षण करणं, शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी याचा उपयोग होतो. 

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : ऋतूप्रमाणे आहार असावा असं म्हणतात. त्यामुळे या ऋतूत भरपूर फळं, भाज्या खाऊन घ्या. हिवाळ्यात मुबलक प्रमाणात ताज्या भाज्या मिळतात, त्यामुळे घरोघरी विविध पदार्थ बनवले जातात. या ऋतूतली हवाही चांगली असते, त्यामुळे या हवेत चांगलं आणि पोषक खाण्याची संधी असते.
News18
News18
advertisement

हिवाळ्यात मिळणाऱ्या बहुतांश भाज्या - फळांमध्ये व्हिटॅमिन सी आणि डी भरपूर प्रमाणात असतं. सर्दी आणि तापासारख्या संसर्गापासून संरक्षण करणं, शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी याचा उपयोग होतो.

1. लिंबूवर्गीय फळं

लिंबूवर्गीय फळांमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतं, यामुळे रोग प्रतिकारशक्ती वाढते आणि शरीराला सर्दी आणि फ्लू सारख्या हिवाळ्यातील आजारांशी लढण्यास मदत होते. त्यामध्ये अँटिऑक्सिडंट्स देखील असतात जे त्वचेचं आरोग्य चांगलं राखण्यासाठी मदत करतात. हिवाळ्यातल्या कोरडेपणाशी कमी करण्यासाठीही याचा उपयोग होतो. ताजी संत्री खाणं किंवा कोमट पाण्यात लिंबू घालून पिणं हे देखील आरोग्यासाठी चांगलं आहे.

advertisement

Collagen : कोलेजन इंजक्शनची गरजही भासणार नाही, आहारात करा योग्य बदल 

2. रताळं

रताळं हे बीटा-कॅरोटीनचा उत्कृष्ट स्त्रोत आहे, यामध्ये 'व्हिटॅमिन ए' भरपूर प्रमाणात आहे. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत राहते आणि त्वचेसाठीही उपयुक्त आहे. यातील घटक आपल्याला थंडीत उबदार आणि सक्रिय ठेवण्यासाठी ऊर्जा पुरवतात. 

advertisement

3. पालेभाज्या

पालेभाज्यांमध्ये लोह, कॅल्शियम आणि जीवनसत्त्वं A, C आणि K यासह पोषक तत्वांचा समावेश असतो. यामुळे हिवाळ्यातील थकवा दूर करण्यास मदत होते.

4. गाजर

गाजरामध्ये बीटा-कॅरोटीन आणि फायबर भरपूर प्रमाणात असतं, ज्यामुळे डोळ्यांचं आरोग्य आणि पचनासाठी मदत होते. तसंच थंडीमध्ये त्वचा निरोगी ठेवण्यास मदत होते.

Honey Saffron :  मध - केशर - नैसर्गिक औषधांचा खजिना, एकत्र खाण्याचे फायदे भरपूर

advertisement

5. आलं

आल्यामध्ये तापमानवाढीचे गुणधर्म असतात. यामुळे रक्ताभिसरण आणि पचनास मदत होते. घसा खवखवणं आणि जळजळ कमी करण्यास देखील आलं उपयुक्त आहे.

6. लसूण

लसणामध्ये ऍलिसिन असतं, प्रतिजैविक गुणधर्म असल्यानं हिवाळ्यातील संक्रमणापासून संरक्षण करण्यासाठी याचा उपयोग होऊ शकतो.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Winter Food : हिवाळ्यातल्या हंगामी भाज्या खा, तब्येत कमवा, आजार दूर पळवा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल