Honey Saffron : मध - केशर - नैसर्गिक औषधांचा खजिना, एकत्र खाण्याचे फायदे भरपूर
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
मध हा नैसर्गिक गोडवा आणि उर्जेचा स्रोत आहे, तर केशर हे औषधी गुणधर्म आणि सुगंधासाठी प्रसिद्ध आहे. या दोघांचं मिश्रण अनेक आजारांपासून आरामही मिळवून देतं.
मुंबई : मध आणि केशर दोन्ही नैसर्गिक औषधांचा खजिना आहे. आयुर्वेदात त्यांचा उपयोग अनेक रोगांवर उपचार करण्यासाठी केला जातो. मध आणि केशरला आरोग्यासाठी वरदान मानलं जातं. मध हा नैसर्गिक गोडवा आणि उर्जेचा स्रोत आहे, तर केशर हे औषधी गुणधर्म आणि सुगंधासाठी प्रसिद्ध आहे. या दोघांचं मिश्रण अनेक आजारांपासून आरामही मिळवून देतं.
मधाचे फायदे
मध एक नैसर्गिक अँटिऑक्सिडंट आहे आणि यामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. मधामुळे घसादुखी आणि खोकल्यापासून आराम मिळतो. पचनसंस्था सुधारते. त्वचेवर चमक आणण्यासाठी आणि जखमा लवकर भरण्यासही मधामुळे मदत होते.
केशराचे फायदे -
केशरात अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म आहेत. त्यामुळे तणाव आणि नैराश्य कमी होण्यास मदत होते. स्मरणशक्ती वाढवण्यासाठी आणि मन शांत ठेवण्यासाठी केशर उपयुक्त आहे. महिलांना मासिक पाळी संबंधित समस्या दूर करण्यासाठीही केशर फायदेशीर आहे.
advertisement
मध आणि केशर एकत्र खाण्याचे फायदे
मध आणि केशर एकत्र खाल्ल्यानं त्यांचे गुणधर्म अधिक प्रभावी होतात. हे मिश्रण काही समस्यांवर औषध ठरु शकतं.
1. तणाव आणि निद्रेची समस्या कमी करण्यासाठी उपयुक्त
मध आणि केशराचं मिश्रण मेंदूला शांत करतं आणि चांगली झोप घेण्यास मदत करतं. रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास दूध मध आणि केशर मिसळून प्यायल्यानं झोप चांगली लागते.
advertisement
2. पचनसंस्था सुधारते
मध आणि केशरच्या मिश्रणामुळे गॅस, अपचन आणि ॲसिडिटीसारख्या पोटाच्या समस्यांपासून आराम मिळतो. त्यामुळे पचनशक्ती सुधारू शकते.
3. रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यास उपयुक्त
मध आणि केशरमध्ये असलेले अँटी-ऑक्सिडंट शरीराला रोगांशी लढण्यासाठी शक्ती देतात आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास मदत करतात.
advertisement
4. त्वचेसाठी फायदेशीर
मध आणि केशर हे मिश्रण त्वचेला नैसर्गिक चमक देऊ शकतं. सुरकुत्या आणि मुरुम दूर करण्यासाठी देखील हे खूप फायदेशीर मानलं जातं.
5. हृदयाच्या निरोगी आरोग्यासाठी
हे मिश्रण रक्तप्रवाह योग्य राखण्यासाठी उपयुक्त आहे आणि यामुळे हृदय निरोगी ठेवण्यासाठी मदत होते. या दोन्हीचं योग्य प्रकारे सेवन केलं तर ते हृदयासाठी फायदेशीर मानलं जातं.
advertisement
मध - केशराचे फायदे
थकवा आणि अशक्तपणाने त्रस्त नागरिकांना या मिश्रणामुळे शरीराला ऊर्जा मिळते आणि अशक्तपणा दूर होतो.
मानसिक तणावाखाली राहणाऱ्या नागरिकांना मेंदू शांत ठेवून तणाव कमी करण्यासाठी या मिश्रणाचा उपयोग होतो.
पचनाच्या समस्यांमुळे त्रस्त असलेल्या नागरिकांना या मिश्रणामुळे पोट स्वच्छ आणि निरोगी ठेवण्यास मदत होऊ शकते.
सर्दी, खोकला आणि घशाची समस्या असेल तर हे मिश्रण घसा खवखवणं आणि खोकल्यापासून आराम देऊ शकतं.
advertisement
त्वचेसंबंधित समस्या असेल तर यामुळे त्वचेची नैसर्गिक चमक कायम राहते आणि त्वचेच्या आजारांचे परिणाम कमी करण्यास मदत होते.
हे मिश्रण फायदेशीर असले तरी ते मर्यादित प्रमाणातच वापरण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात. गरोदर महिलांनी आणि मुलांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानंच हे मिश्रण खावं.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
January 23, 2025 7:09 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Honey Saffron : मध - केशर - नैसर्गिक औषधांचा खजिना, एकत्र खाण्याचे फायदे भरपूर