Lungs : प्रदूषणापासून जपा फुफ्फुसांचं आरोग्य, फुफ्फुसं निरोगी ठेवण्यासाठी हे उपाय नक्की करा
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
फुफ्फुसात साचलेल्या धुळीच्या थरांमुळे श्वास घ्यायला त्रास होणं, थकवा येणं आणि श्वसनाच्या इतर समस्या उद्भवू शकतात. काही सोप्या आणि नैसर्गिक घरगुती उपायांनी फुफ्फुसांचं आरोग्य जपता येऊ शकतं.
मुंबई : प्रदूषणामुळे, सतत बदलत्या हवामानामुळे तब्येतीवर परिणाम जाणवतात. वाढतं प्रदूषित वातावरण, धूम्रपान आणि खाण्याच्या चुकीच्या सवयींमुळे आपल्या फुफ्फुसांचं आरोग्य बिघडू शकतं. फुफ्फुसात साचलेल्या धुळीच्या थरांमुळे श्वास घ्यायला त्रास होणं, थकवा येणं आणि श्वसनाच्या इतर समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे फुफ्फुसांची स्वच्छता आणि आरोग्य राखणं महत्वाचं आहे. जेणेकरून आपण प्रदूषण आणि संसर्गापासून सुरक्षित राहू शकू.
काही सोप्या आणि नैसर्गिक घरगुती उपायांनी फुफ्फुसांचं आरोग्य जपता येऊ शकतं. पाहूया यातले पाच 5 प्रभावी उपाय. या उपायांमुळे तुमची फुफ्फुसं स्वच्छ आणि निरोगी राहण्यास मदत होऊ शकते.
1. वाफ घेणं
फुफ्फुसांच्या स्वच्छतेसाठी वाफ घेणं हा एक प्रभावी आणि सोपा उपाय आहे. एका भांड्यात गरम पाणी घेऊन त्यात पुदिना किंवा निलगिरी तेलाचे काही थेंब टाका. डोक्यावर टॉवेल ठेवा आणि ही वाफ श्वासात खोलवर घ्या.
advertisement
या उपायामुळे फुफ्फुसातील धुळीसारखे विषारी घटक काढून टाकण्यास मदत होते. यासाठी तुम्ही स्टिमरचाही वापर करु शकता.
2. हळद आणि दूध
हळदीमध्ये अँटीऑक्सिडंट आणि दाहक-विरोधी गुणधर्म असतात, जे फुफ्फुसांना विषारी घटक काढून टाकण्यास मदत करतात. एक ग्लास गरम दुधात अर्धा चमचा हळद मिसळा. रात्री झोपण्यापूर्वी हे दूध प्या. या उपायामुळे फुफ्फुसांमध्ये साचलेली घाण दूर होते आणि त्यांची कार्यक्षमता वाढते.
advertisement
3. आलं
आल्यामध्ये असलेल्या नैसर्गिक गुणधर्मांमुळे सूज कमी करणं आणि फुफ्फुसांची स्वच्छता करणं शक्य होतं. यासाठी आलं कच्चं खाता येईल किंवा आल्याचा चहा प्या. आल्याच्या रसात मध मिसळून दिवसातून दोनदा सेवन करा. या उपायामुळे श्लेष्म किंवा कफ पातळ होतो आणि श्वास घेणं सुलभ होतं.
advertisement
4. गरम पाणी आणि लिंबू
लिंबामध्ये व्हिटॅमिन सी असते, ज्यामुळे फुफ्फुसं स्वच्छ आणि मजबूत करण्यास मदत होते. कोमट पाण्यात अर्धा लिंबू पिळून सकाळी रिकाम्या पोटी प्या. या उपायामुळे शरीरातून आणि फुफ्फुसातील विषारी पदार्थ काढून टाकण्यासाठी मदत होते.
advertisement
5. व्यायाम आणि खोल श्वास
फुफ्फुसं निरोगी आणि स्वच्छ ठेवण्यासाठी नियमित व्यायाम आणि दीर्घ श्वसन करणं खूप महत्वाचं आहे. दररोज योगासनं करा, ज्यामध्ये प्राणायाम आणि अनुलोम-विलोम यांचा समावेश करा. मोकळ्या हवेत चालण्याचा आणि धावण्याचा सराव करा. या उपायामुळे फुफ्फुसांना ऑक्सिजनचा पुरवठा वाढतो आणि फुफ्फुसं निरोगी ठेवण्यासाठी उपयोग होतो.
advertisement
फुफ्फुसांच्या आरोग्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा:
धूम्रपान टाळा.
तुम्ही खूप प्रदूषणाच्या ठिकाणी राहत असाल तर घरी एअर प्युरिफायर वापरा.
हिरव्या भाज्या आणि फळं खाण्यावर भर द्या.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
January 23, 2025 2:46 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Lungs : प्रदूषणापासून जपा फुफ्फुसांचं आरोग्य, फुफ्फुसं निरोगी ठेवण्यासाठी हे उपाय नक्की करा