Guava Leaves : दाट आणि मजबूत केसांसाठी नैसर्गिक पर्याय, पेरुची पानं वाढवतील केसांचं सौंदर्य
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
हवामानात बदल झाला की केस गळणं, आणि कोंडा होण्यास सुरुवात होते. सतत केस गळल्यामुळे केस कमकुवत होतात आणि केसांची वाढही थांबते. तुम्हालाही केस मजबूत आणि चांगले वाढवायचे असतील असतील तर तुम्ही पेरूच्या पानांचा वापर करू शकता.
मुंबई : पेरु हे आवडीनं खाल्लं जाणारं फळ..पेरु नुसता खा किंवा तिखट मीठ लावून खा, करकरीत खा, किंवा मऊ झालेला, त्याची चव सुंदर लागते. पेरुसोबतच पेरुची पानंही आरोग्यासाठी महत्त्वाची आहेत. केसांची लांबी वाढवण्यासाठीच नव्हे तर केसांच्या वाढीसाठी पेरूच्या पानांची मदत होते.
पेरूच्या पानांचा वापर केस लांब, दाट आणि मजबूत करण्यासाठी होतो. तुम्हालाही केसांशी संबंधित
समस्या जाणवत असतील तर हा एक चांगला पर्याय आहे. हवामानात बदल झाला की केस गळणं, आणि कोंडा होण्यास सुरुवात होते. सतत केस गळल्यामुळे केस कमकुवत होतात आणि केसांची वाढही थांबते. तुम्हालाही केस मजबूत आणि चांगले वाढवायचे असतील असतील तर तुम्ही पेरूच्या पानांचा वापर करू शकता.
advertisement
पेरु या फळाच्या बिया आणि पानं देखील गुणांचा खजिना असल्याचं म्हटलं जातं. पेरूच्या पानांचा वापर केवळ आरोग्यासाठीच नाही तर केश सौंदर्य वाढवण्यासाठीही केला जाऊ शकतो. पेरूची पानं केसांच्या वाढीसाठी वापरता येतात. पेरूच्या पानांमध्ये असलेलं व्हिटॅमिन सी, अँटी-ऑक्सिडंट्स आणि फॉलिक ॲसिडमुळे केस मजबूत होतात आणि त्यांची वाढ चांगली होते.
advertisement
केसांच्या वाढीसाठी पेरूच्या पानांचा वापर केसांवर कसा करायचा पाहूया
सर्वप्रथम पेरुची पानं घ्या.
ही पानं पाण्यात काही मिनिटं उकळा. नंतर हे पाणी नीट गाळून घ्या.
पाणी थंड झाल्यावर ते केस आणि टाळूवर वापरा. हे पाणी तुम्ही शॅम्पूमध्ये मिसळू शकता.
advertisement
तुम्हाला हवं असेल तर तुम्ही पेरुच्या पानांचं पाणी थेट केसांना लावू शकता.
त्यानंतर काही मिनिटांनी केस सौम्य शॅम्पूनं धुवा. यामुळे केसांची वाढ होण्यास मदत होऊ शकते.
याशिवाय पेरूची पानांची पेस्ट करुनही केसांवर लावू शकता.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
January 23, 2025 12:14 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Guava Leaves : दाट आणि मजबूत केसांसाठी नैसर्गिक पर्याय, पेरुची पानं वाढवतील केसांचं सौंदर्य