रांची : आजकाल धावपळीच्या या जीवनात आरोग्याला विविध व्याधी जडतात. अनियमित मासिकपाळी ही तर आता एक सर्वसामान्य समस्या झाली आहे. परंतु म्हणून तिच्याकडे दुर्लक्ष करणं योग्य नाही. सुदृढ आरोग्यासाठी पाळी वेळेवर येणं आवश्यक असतं. त्यासाठी योग्य ते उपचार घ्यायला हवे. एखादा महिना चूकणंही घातक असतं. काही महिलांना तर 2-3 किंवा 5-5 महिने पाळी येत नाही. अशावेळी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
advertisement
झारखंडची राजधानी असलेल्या रांचीमधील आलम रुग्णालयाच्या स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. परबीन यानी सांगितलं की, मासिकपाळी नियमितपणे न येण्याचं सर्वात मोठं कारण आहे चुकीची जीवनशैली आणि अवेळी जेवण. जंक फूड अतिप्रमाणात खाणंं हेदेखील याचं कारण आहे.
हेही वाचा : Death facts : मृत्यूआधी वाचा का जाते? काहीतरी सांगायचं असतं पण बोलताच येत नाही, असं का होतं?
आपल्या पोटात नकळतपणे मोठ्या प्रमाणात साखर जाते. सॉफ्ट ड्रिंकसह असे अनेक पदार्थ असतात ज्यांमध्ये भरपूर साखर असते. या साखरेचे शरिरावर दुष्परिणाम होतात. जंक फूड जास्त प्रमाणात खाल्ल्याने स्थूलपणा वाढतो. गर्भाशयात सूज आल्यास त्याचा परिणाम पाळीवर होतो. जंक फूडमुळे रक्तातले अशुद्ध घटक वाढतात. ज्यामुळे मासिकपाळीचं वेळापत्रक बिघडतं.
हेही वाचा : UPSC Result: IAS होणारी सृष्टी आहे खूप सुंदर, बघूनच म्हणाल "Beauty with brain"
डॉ. परबीन सांगतात की, काही टिप्स फॉलो केल्याने काही आठवड्यांतच आपली पाळी नियमित होण्यास मदत मिळेल. जसं की, बाहेरचे अन्नपदार्थ खाणं पूर्णपणे कमी करावं. जास्तीत जास्त फळं आणि कडधान्य खावी. दररोज 2-3 लीटर पाणी प्यावं. पाणी कोमट असेल तर उत्तम. तसंच दररोज कमीत कमी 45 मिनिटं चालावं. मेडिटेशनचाही आपल्याला फायदा होईल. यामुळे आपला ताण हळूहळू कमी होईल. ताणामुळे शरिरातील हॉर्मोन्स असंतुलित होतात. परिणामी मेडिटेशनमुळे हॉर्मोन्स संतुलित राहण्यास मदत मिळेल.