लवंग पावडर
लवंग पावडरीत बॅक्टेरियाविरोधी गुणधर्म असतात. दाताची किड कमी करण्यासाठी याचा फायदा होतो. लवंग पावडर आणि पाणी, खोबरेल तेल किंवा लवंग तेलाची पेस्ट बनवा. कुजलेल्या दातावर ही पेस्ट लावा आणि काही वेळ ठेवा आणि नंतर धुवून स्वच्छ करा. किडलेल्या दातावर तुम्ही खोबरेल तेल लावू शकता. हे तेल कापसात टाकून दातांना लावता येतं. ते दातांमध्ये दाबून ठेवा आणि काही वेळानंतर स्वच्छ धुवा. तेल तुम्ही गिळणार नाही याकडे लक्ष द्या.
advertisement
हळद पेस्ट
मोहरीचं तेल आणि हळद एकत्र करून पेस्ट तयार करा. दात किडणं कमी करण्यासाठी ही पेस्ट लावता येते. हळदीमध्ये दाहक-विरोधी, प्रतिजैविक आणि बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारे गुणधर्म असतात ज्यामुळे दाताची किड कमी करण्यासाठी याचा उपयोग होतो. हळदीची पेस्ट अर्धा तास दातांवर ठेवल्यानंतर धुवा.
Weight Loss Meal : लठ्ठपणा आटोक्यात आणण्यासाठी घ्या आयुर्वेदानुसार आहार, नैसर्गिकरीत्या वजन होईल कमी
कडुनिंब -
कडुनिंबाचा उपयोग शतकानुशतकं औषध म्हणून केला जातो आहे. कडुनिंबाच्या काड्याच नव्हे तर कडुनिंबाची पानं देखील दातांसाठी फायदेशीर आहेत. कडुनिंब बारीक करून त्याची पेस्ट दातांवर ठेवता येते. कडुनिंबाची पानं पाण्यात उकळून रोज या पाण्यानं तोंड स्वच्छ धुवा.
लसूण
लसणाचा वापर जीवाणूंशी लढण्यासाठी आणि दात किडण्याचं प्रमाण कमी करण्यासाठी केला जाऊ शकतो. कच्चा लसूण ठेचून दातांवर लावा. काही वेळ ठेवल्यानंतर तोंडातून बाहेर काढा.
पेरुची पानं
किडलेले दात बरे करण्यासाठी पेरुच्या पानांचा वापर केला जाऊ शकतो. पेरुच्या पानांमध्ये अँटी-ऑक्सिडंट्स, अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म आणि अँटीमाइक्रोबियल गुणधर्म असतात. तोंडातल्या जीवाणूशी लढून हिरड्या निरोगी ठेवण्यासाठी याचा उपयोग होतो. यामुळे दात किडणं तर कमी होतंच पण दातदुखीपासूनही आराम मिळतो. पेरुची पानं कुस्करून दातांमध्ये ठेवता येतात.