Winter Heart Care Tips : हिवाळ्यात हृदयाच्या आरोग्याची काळजी घेणं आवश्यक, पोषक आहार, व्यायाम, विश्रांतीकडे द्या लक्ष

Last Updated:

हिवाळ्यामध्ये प्रकृतीच्या अनेक समस्या जाणवतात. त्यातच, ज्यांचं हृदय कमकुवत आहे अशा नागरिकांनी हिवाळ्यात विशेष काळजी घेणं जास्त गरजेचं आहे.

News18
News18
मुंबई : हिवाळ्यामध्ये प्रकृतीच्या अनेक समस्या जाणवतात. त्यातच, ज्यांचं हृदय कमकुवत आहे अशा नागरिकांनी हिवाळ्यात विशेष काळजी घेणं जास्त गरजेचं आहे. विशेषत: ज्यांना आधीच हृदयविकाराचा त्रास आहे, त्यांनी तब्येतीची अधिक काळजी घ्यायला हवी.
हिवाळ्यात थंड आणि सुखदायक वारा असतो, पण कमकुवत हृदय असलेल्यांसाठी ते आव्हानात्मक ठरु शकतं. थंडीच्या वातावरणात रक्तदाब वाढून रक्तवाहिन्या आकुंचन पावल्यामुळे हृदयविकाराचा झटका आणि हृदयविकाराचा धोका वाढतो. अशा परिस्थितीत हृदय निरोगी ठेवण्यासाठी काही खास उपाय करणं गरजेचं आहे. योग्य आहार, नियमित व्यायाम आणि तणावमुक्त जीवनशैलीचा अवलंब करून तुम्ही हृदय निरोगी ठेवू शकता.
advertisement
1. पोषक आहाराचं महत्त्व
हिवाळ्यात पोषक आहार घेणं खूप गरजेचं आहे. हिरव्या पालेभाज्या (पालक, मेथी इ.) आणि मोसंबी, डाळिंब आणि पेरू यासारखी फळं खा. आपल्या आहारात दलिया आणि ओट्स सारख्या फायबरयुक्त पदार्थांचा समावेश करा. तळलेले आणि जंक फूड टाळा कारण यामुळे कोलेस्ट्रॉल वाढू शकतं. हृदयासाठी फायदेशीर असलेले मासे, अक्रोड यांसारखे ओमेगा-३ फॅटी ॲसिड असलेले पदार्थ खा.
advertisement
2. व्यायाम करत रहा
थंड हवामानात शारीरिक हालचाली कमी होतात, हृदयाच्या आरोग्यासाठी ही बाब चांगली नाही. त्यामुळे नियमित योगा, चालणं किंवा हलका व्यायाम करा. बाहेर खूप थंडी असेल तर फक्त घरातच व्यायाम करा. दिवसाच्या सुरुवातीला 15-30 मिनिटं प्राणायाम आणि दीर्घ श्वासोच्छवासाचे व्यायाम करा.
advertisement
3. शरीर उबदार ठेवा
हिवाळ्यात थंडीपासून बचाव करण्यासाठी शरीर उबदार ठेवणं गरजेचं आहे. लोकरीचे कपडे घाला आणि विशेषतः डोकं, कान आणि पाय झाकून ठेवा. रात्री झोपताना ब्लँकेट वापरा आणि खोलीचं तापमान नियंत्रित करा.
4. तणाव टाळा
advertisement
तणाव आणि चिंता ही हृदयविकाराची प्रमुख कारणं आहेत. ध्यान करा आणि पुरेशी विश्रांती घ्या. पुरेशी झोप घ्या, कारण चांगली झोप हृदयाच्या आरोग्यासाठी महत्त्वाची आहे. सकारात्मक विचार करा आणि वेळ आनंदानं घालवण्याचा प्रयत्न करा.
5. धूम्रपान आणि मद्यपानापासून दूर राहा
धूम्रपान आणि अल्कोहोलचं सेवन हृदयासाठी हानिकारक ठरु शकतं. यामुळे रक्तवाहिन्यांचं नुकसान होतं आणि हृदयविकाराचा धोका वाढतो.
advertisement
6. वैद्यकीय तपासणी करत रहा
तुमचा रक्तदाब, कोलेस्ट्रॉल आणि रक्तातील साखरेची नियमित तपासणी करा. तुम्हाला आधीपासून हृदयाशी संबंधित कोणतीही समस्या असल्यास, डॉक्टरांचा सल्ला घ्या.
7. पुरेसं पाणी प्या
थंडीच्या वातावरणात पाणी कमी पितात. ज्यामुळे शरीरात डिहायड्रेशन होऊ शकतं. पुरेसं पाणी प्यायल्यानं हृदयाचे ठोके नियंत्रित राहण्यास मदत होते.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Winter Heart Care Tips : हिवाळ्यात हृदयाच्या आरोग्याची काळजी घेणं आवश्यक, पोषक आहार, व्यायाम, विश्रांतीकडे द्या लक्ष
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement