advertisement

Raisins, Chickpeas : दिवस उत्साही जाण्यासाठी खास टिप्स, रिकाम्या पोटी खा चणे आणि मनुका

Last Updated:

रिकाम्या पोटी हरभरा आणि मनुका खाणं आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. यामुळे शरीराचं पोषण तर होतंच, शिवाय अनेक आजारांपासून बचाव करण्यासही मदत होते. पण तुम्हाला कोणत्याही प्रकारची ऍलर्जी असेल तर हे दोन्ही पदार्थ खाण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या. याचं प्रमाण योग्य ठेवा, कारण जास्त प्रमाणात खाल्ल्यानं गॅस किंवा अपचन होऊ शकतं.

News18
News18
मुंबई : दिवस उत्साहात जाण्यासाठी आपण काय खातो हे महत्त्वाचं आहे. यासाठी काही सोपे उपाय करुन बघा. यातला एक चांगला पर्याय म्हणजे, चणे आणि मनुका....विशेषतः भाजलेले चणे आरोग्यासाठी पोषक मानले जातात. हे दोन्ही पदार्थ रिकाम्या पोटी खाल्ल्यानं शरीराला अनेक फायदे मिळतात.
रिकाम्या पोटी हरभरा आणि मनुका खाणं आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. यामुळे शरीराचं पोषण तर होतंच, शिवाय अनेक आजारांपासून बचाव करण्यासही मदत होते. त्यामुळे तुम्हाला तुमचा दिवस उत्साहात सुरू करायचा असेल, तर हा सोपा उपाय आहे. पाहूयात याचे फायदे..
advertisement
हरभरा / चणे
हरभरा हा प्रथिनं, फायबर, लोह आणि इतर आवश्यक पोषक तत्वांचा चांगला स्रोत आहे. हरभऱ्यामध्ये असलेल्या फायबरमुळे पचनक्रिया सुधारते आणि बद्धकोष्ठतेची समस्या दूर करते. रिकाम्या पोटी हरभरा खाल्ल्यानं दिवसभर एनर्जी टिकून राहते. हरभरा हे हळूहळू पचणारे कार्बोहायड्रेट आहे, जे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करते. यामुळे पोट बराच काळ भरलेलं राहतं, त्यामुळे अनावश्यक अन्न खाल्लं जात नाही. हरभऱ्यामध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरस असते, ज्यामुळे हाडं मजबूत होतात.
advertisement
बेदाणे
वाळलेल्या द्राक्षांपासून बेदाणे बनवले जातात आणि त्यात अँटिऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वं आणि खनिजं भरपूर असतात. मनुकांमध्ये लोह असतं, ज्यामुळे ॲनिमिया दूर करण्यात मदत होते. त्यात नैसर्गिक साखर असते, ज्यामुळे पचन सुधारतं. मनुकांमध्ये अँटिऑक्सिडेंट असतात, जे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतात. मनुकांमध्ये असलेले व्हिटॅमिन सी आणि ए मुळे त्वचा चमकदार आणि निरोगी बनते. मनुके कोलेस्ट्रॉल नियंत्रित करतात आणि हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात.
advertisement
या दोन्ही घटकांमुळे, शरीर विषारी पदार्थांपासून मुक्त राहतं. पोषणाचा चांगला स्रोत असल्यानं यातील प्रथिनं आणि जीवनसत्त्वांचं संतुलन शरीराच्या एकूण आरोग्यासाठी चांगलं असतं. थकवा दूर करुन, या मिश्रणामुळे सकाळी शरीराला झटपट ऊर्जा मिळते. मनुका आणि हरभरा नियमित खाल्ल्यानं मुख्यत्वे महिलांमध्ये जाणवणारं संप्रेरकांचं असंतुलन राखता येतं. यामध्ये असलेल्या खनिजांमुळे केस मजबूत होतात आणि त्वचा उजळते.
advertisement
यासाठी 7-8 ग्रॅम चणे आणि 8-10 मनुके रात्रभर पाण्यात भिजत ठेवा. हे सकाळी रिकाम्या पोटी खा. हे नियमित खाल्ल्यानं त्याचे सकारात्मक परिणाम काही दिवसातच दिसतील. काही जण भाजलेले चणे खाणं पसंत करतात. पण तुम्हाला कोणत्याही प्रकारची ऍलर्जी असेल तर हे दोन्ही पदार्थ खाण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या. याचं प्रमाण योग्य ठेवा, कारण जास्त प्रमाणात खाल्ल्यानं गॅस किंवा अपचन होऊ शकतं.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Raisins, Chickpeas : दिवस उत्साही जाण्यासाठी खास टिप्स, रिकाम्या पोटी खा चणे आणि मनुका
Next Article
advertisement
सूर्यास्तानंतर आकाशात काहीतरी मोठं घडणार, दुर्लक्ष करू नका; उघड्या डोळ्यांनी दिसणार गूढ अन् दुर्मीळ दृश्य
सूर्यास्तानंतर काहीतरी मोठं घडणार, दुर्लक्ष करू नका;दिसणार गूढ अन् दुर्मीळ दृश्य
  • 28 फेब्रुवारीची रात्र ठरणार 'कयामत'

  • दृश्य पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही

  • रहस्यमयी रांग आणि पृथ्वीवरचा परिणाम...

View All
advertisement