सध्या कॉम्प्युटरवरच्या कामामुळे, त्याचा परिणाम डोळ्यांवर होऊ लागतो. कॉम्प्युटर आणि मोबाईल अति वापरल्यामुळे डोळे कमकुवत होऊ लागतात आणि मज्जातंतूंवर परिणाम होऊ लागतो. याशिवाय डोळ्यांच्या दृष्टीवरही परिणाम होतो. डोळे दुखणं, कमी दिसणं, चष्म्याचा नंबर वाढणं यासारख्या समस्या जाणवू शकतात. डोळ्यांचा चष्मा काढण्यासाठी आणि विकार कमी करण्यासाठी काही उपायांचा अवलंब केला जाऊ शकतो.
advertisement
Skin Care : चेहऱ्यावरच्या तजेल्यासाठी अशी घ्या काळजी, घरच्याच वस्तू देतील सुंदर ग्लो
हे उपाय करुन पाहा -
त्रिफळा
त्रिफळा आणा, त्रिफळा बारीक करुन त्याची पावडर बनवा. दररोज रात्री झोपण्यापूर्वी एक चमचा त्रिफळा चूर्ण घ्या आणि त्यात मध किंवा देशी तूप घालून चांगलं मिसळा. आता हे मिश्रण रात्री झोपण्यापूर्वी चाटावं. त्रिफळा डोळ्यांसाठी खूप फायदेशीर आहे, त्यात अनेक पोषक घटक असतात.
डोळे पाण्यानं स्वच्छ धुवा
डोळ्याभोवती साचलेली घाण सहज साफ करता यावी म्हणून डोळे पाण्यानं धुणंही महत्त्वाचं आहे. यासाठी सकाळी आणि संध्याकाळी डोळे थंड पाण्यानं धुवावेत. लॅपटॉप किंवा फोनवर खूप काम करायचं असेल तर, तुम्ही दिवसभरात ब्रेक घेता तेव्हा डोळे धुवू शकता. पाण्यामुळे डोळ्यांना थोडा आराम मिळतो.
हिरव्या भाज्या खा
हिरव्या भाज्यांमध्ये अनेक पोषक घटक असतात. जीवनसत्त्वांपासून ते अँटिऑक्सिडंटपर्यंत अनेक गोष्टी आहेत. ज्यामुळे दृष्टी सुधारण्यास मदत होते. हिवाळ्यात तुम्ही पालक, मेथी भरपूर खाऊ शकता. या उपायांचं पालन व्यवस्थित केलं तर तुम्हाला परिणाम दिसून येतील.
डोळ्यांचा व्यायाम करा
शरीर निरोगी ठेवण्यासाठी ज्याप्रमाणे शारीरिक व्यायाम करणं आवश्यक आहे, त्याचप्रमाणे डोळ्यांना निरोगी ठेवण्यासाठी व्यायाम करणं आवश्यक आहे. डॉक्टरांकडून डोळ्यांचे व्यायाम शिकून घ्या. यामुळे डोळ्यांना मोठा आराम मिळतो.
पुरेशी झोप घ्या
डोळे निरोगी ठेवण्यासाठी पुरेशी झोपही तितकीच महत्त्वाची आहे. जर तुम्ही सतत काम करत राहिलात तर डोळे थकायला लागतात आणि कमजोर देखील होतात. या कारणामुळे, झोपेबद्दल अजिबात तडजोड करू नका. पूर्ण 8 तासांची झोप घ्या.
आईस पॅकचा वापर करा
डोळ्यांना काही दुखापत झाली असेल किंवा तुमचे डोळे जळजळत असतील तर दिवसातून एकदा 15-20 मिनिटांसाठी बर्फाचा पॅक लावा. यामुळे डोळ्यांना आराम मिळतो. डोळ्यांतील जळजळही बरी होऊन आरामही मिळतो.
डोळ्यांची नियमित तपासणी करा
दर तीन महिन्यांनी डोळे तपासत राहा. तुम्ही करत असलेल्या उपायांचा तुमच्या डोळ्यांवर किती परिणाम होत आहे याविषयी तुम्हाला कळू शकेल.
चष्मा नियमितपणे वापरा
अनेकांना डोळ्यांच्या समस्या असतात पण चष्मा नियमित लावत नाहीत. असं केल्यामुळे डोळ्यांवरचा ताण वाढू शकतो.