Gut Health : चांगल्या आरोग्यासाठी आतड्यांचं आरोग्य महत्त्वाचं, काळजी घेतली तर आजारी पडण्याचं प्रमाण होईल कमी

Last Updated:

आपली तब्येत चांगली राहते आपण करत असलेल्या आहारामुळे आणि आतड्यांच्या आरोग्यामुळे. आतड्याच्या आरोग्याची काळजी घेतल्यास तुम्ही कधीही आजारी पडणार नाही.

News18
News18
मुंबई : आपली तब्येत चांगली राहते ती आपण करत असलेल्या आहारामुळे आणि आतड्यांच्या आरोग्यामुळे. आतड्याच्या आरोग्याची काळजी घेतल्यास तुम्ही कधीही आजारी पडणार नाही. आरोग्य चांगलं राखण्यासाठी आतडी महत्त्वाची भूमिका बजावतात.
अन्न पचवण्यात, हार्मोन्स संतुलित करण्यात, चयापचय वाढवण्यात आणि शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यात आतड्यांचं काम सगळ्यात महत्त्वाचं असतं. त्यामुळे आतड्यांच्या आरोग्याची योग्य काळजी घेणं फार आवश्यक आहे. बदलणारी जीवनशैली आणि फास्ट फूडच्या वाढत्या सेवनामुळे आतड्याच्या आरोग्यावर वाईट परिणाम होत आहेत, त्यामुळे कोलेस्ट्रॉल, मधुमेह, रक्तदाब अशा गंभीर आजारांचं प्रमाण वाढतंय.
आतड्याचं आरोग्य -
advertisement
1 - आतड्याचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी पुरेसं पाणी प्यावं. दिवसभरात किमान 8 ते 10 ग्लास पाणी प्या. अन्न खाण्यापूर्वी आणि नंतर ३० मिनिटं जास्त पाणी पिणं टाळावं.
2 - आतड्याच्या चांगल्या आरोग्यासाठी, आपला आहार चांगला असणं गरजेचं आहे. फळं, भाज्या, कडधान्य, सुका मेवा आतड्यांसाठी फायदेशीर आहेत.
advertisement
3 - आतड्यांमध्ये चांगले बॅक्टेरिया विकसित होण्यासाठी तुम्ही दही, ताक, इडली, डोसा असे आंबवलेले पदार्थ खाऊ शकता, यामुळे तुमच्या आतड्यांमध्ये चांगले बॅक्टेरिया वाढू शकतात.
4 - आतड्याचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी व्यायाम करायला विसरू नका. तुम्ही दररोज 40-45 मिनिटं चालू शकता. पोहणं, धावणं, सायकल चालवणं, पायऱ्यांची चढ उतार यासारखे हलके व्यायाम करू शकता. योगासनं, ध्यानधारणा आणि व्यायामशाळा हे देखील तुमच्या आतड्याच्या आरोग्यासाठी चांगले आहे.
advertisement
खराब आतड्यांमुळे कोणत्या समस्या उद्भवू शकतात?
प्रतिकारशक्ती कमकुवत होणं, चिंता, तणाव, हार्मोनल असंतुलन, वजन वाढणं, खराब पचन,उच्च रक्तदाब, कोलेस्टेरॉल, चयापचय मंदावणं
कोणत्या चुका मानसिक आरोग्य बिघडवतात?
उपवासामुळे तुमच्या आतड्याचं आरोग्य बिघडू शकतं.
जास्त ताणामुळे तुमच्या आतड्याचे आरोग्यही बिघडतं.
जास्त तळलेलं अन्न खाल्ल्यानं तुमच्या आतड्याच्या आरोग्यावरही वाईट परिणाम होतो.
जास्त औषधं खाल्ल्यानंही तुमच्या आतड्याचं आरोग्य बिघडतं.
advertisement
या सगळ्या मुद्द्यांचा नक्की विचार करा आणि आरोग्याची काळजी घ्या.
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Gut Health : चांगल्या आरोग्यासाठी आतड्यांचं आरोग्य महत्त्वाचं, काळजी घेतली तर आजारी पडण्याचं प्रमाण होईल कमी
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement