Skin Care : चेहऱ्यावरच्या तजेल्यासाठी अशी घ्या काळजी, घरच्याच वस्तू देतील सुंदर ग्लो

Last Updated:

दिवसभराच्या धावपळीनंतर थकवा येतो, चेहराही निस्तेज वाटू शकतो अशावेळी, रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्यावर नारळाचं तेल, कोरफड गर लावू शकता. यामुळे, चेहऱ्यावरचे डाग कमी होतात आणि चेहरा खुलून दिसतो.

News18
News18
मुंबई : चेहऱ्याच्या स्वच्छतेसाठी तुम्ही काय करता ? दिवसभराच्या धावपळीनंतर थकवा येतो, चेहराही निस्तेज वाटू शकतो अशावेळी, रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्यावर नारळाचं तेल, कोरफड गर लावू शकता. यामुळे, चेहऱ्यावरचे डाग कमी होतात आणि चेहरा खुलून दिसतो.
रात्री झोपायच्या आधी त्वचेची काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे. पण, रात्रीच्या वेळी केमिकल उत्पादनं लावण्याऐवजी काही घरगुती वस्तू वापरता येतात. चेहऱ्याच्या सौंदर्यासोबतच त्वचेशी संबंधित अनेक समस्या दूर करण्यासाठी हे उपाय प्रभावी ठरतात.
नारळाचं तेल 
advertisement
तुमची त्वचा जास्त कोरडी असेल तर तुम्ही झोपण्यापूर्वी खोबरेल तेल लावू शकता.नारळाच्या तेलानं
त्वचेचा कोरडेपणा दूर होतो आणि तेलामुळे त्वचा मुलायम होते. खोबरेल तेलामुळे, त्वचेला तडे जाण्याचं
प्रमाण कमी होतं.
advertisement
व्हिटॅमिन ई कॅप्सूल
व्हिटॅमिन ई कॅप्सूल चेहऱ्यावरही लावता येते. व्हिटॅमिन ई कॅप्सूलमुळे त्वचेचं आरोग्य चांगलं राहतं. तुम्ही ही कॅप्सूल जशी आहे तशी चेहऱ्यावर लावू शकता किंवा त्यात बदामाचं तेल किंवा कोरफड मिसळून चेहऱ्याला लावू शकता. यामुळे त्वचेचा पोत सुधारतो.
advertisement
कोरफड गर
त्वचेसाठी कोरफड फायदेशीर आहे. कोरफडीमुळे त्वचेचं आरोग्य चांगलं राहतं. हिवाळ्यात कोरड्या वाऱ्यांमुळे त्वचा ताणल्यासारखी वाटते. अशावेळी, कोरफडीचा वापर केला तर त्वचेच्या या समस्येपासून आराम मिळतो.
कच्चं दूध
दिवसभर विविध प्रकारची धूळ चेहऱ्याला चिकटलेली असते. ती दूर करण्यासाठी चेहऱ्यावर कच्चं दूध लावता येतं. एका भांड्यात कच्चं दूध घेऊन त्यात कापूस बुडवून चेहऱ्यावर लावा. कच्च्या दुधाच्या वापरानं चेहऱ्याची त्वचा उजळ होते आणि चेहऱ्यावरील मृत त्वचेच्या पेशी निघून जातात.
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Skin Care : चेहऱ्यावरच्या तजेल्यासाठी अशी घ्या काळजी, घरच्याच वस्तू देतील सुंदर ग्लो
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement