या बदलत्या हवेत, प्रतिकारशक्ती चांगली असणं खूप महत्त्वाचं आहे. त्यातच, देशातील अनेक राज्यांत कोरोनाचे रुग्ण आढळतायत. त्यामुळे आरोग्य तज्ज्ञांनी प्रकृती चांगली ठेवण्यासाठी सल्ला दिला आहे. ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते आणि यासाठी आवश्यक सर्व गोष्टी सहसा भारतीय स्वयंपाकघरांमध्ये असतात.
रोगप्रतिकारक शक्ती कशी मजबूत करावी?
प्रतिकारशक्ती कशी मजबूत करू शकतो याविषयी सेलिब्रिटी न्यूट्रिशनिस्ट पूजा मखीजा यांनी इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. पावसाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती वाढवणाऱ्या पदार्थांबद्दल चर्चा अधिक होते. पोट आनंदी नसेल तर रोगप्रतिकारक शक्ती देखील आनंदी राहू शकत नाही. सत्तर टक्के रोगप्रतिकारक पेशी आपल्या आतड्यांत असतात. म्हणून जर आतडी निरोगी आणि पुरेशी मजबूत नसतील तर ते व्हिटॅमिन सप्लिमेंट्स, झिंक, व्हिटॅमिन डी शोषू शकत नाही.
advertisement
निरोगी आतड्यांसाठी गरम अन्न खा -
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, अँटीबायोटिक्सचं जास्त सेवन किंवा जास्त ताण यामुळे मायक्रोबायोमचं नुकसान होऊ शकतं, ज्याला 'leaky gut' म्हणतात. मायक्रोबायोम मजबूत करण्यासाठी, म्हणजेच मानवी शरीरातील सुक्ष्म जीव समुदाय यासाठी गरम अन्न खावं आणि ओवा, जिरं, बडीशेप घालून कोमट पाणी प्यावं असा सल्ला त्यांनी दिला आहे.
आतडी निरोगी ठेवण्यासाठी काय खावं ?
मुळेठी, त्रिफळा, जिरं, कोरफड, ओवा, बडीशेप यामुळे आतड्यांतील स्तरांना आराम मिळतो आणि जळजळ कमी होते. त्रिफळा डिटॉक्सिफिकेशनमध्ये मदत करते, बद्धकोष्ठतेची समस्या आहे त्यांच्यासाठी त्रिफळा हा एक चांगला पर्याय आहे. त्रिफळामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
Digestion : पोटाच्या आरोग्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला, नैसर्गिक उपाय ठरतील उपयुक्त
जिऱ्यामुळे एन्झाईम्सना चालना मिळते. त्यात एपिजेनिनसारखे अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात, ज्याचा उपयोग आतड्यांसाठी होतो.
ओव्यात असलेल्या थायमॉलमुळे गॅस आणि पोटफुगी कमी होऊ शकते.
बडीशेपेमुळे आतड्याच्या अस्तरांना आराम मिळतो आणि पेटक्यांचं प्रमाण कमी होतं. त्यात अॅनेथोल असतं, हार्मोनल बदलांदरम्यान महिलांसाठी हा खूप महत्त्वाचा घटक आहे. यामुळे पोटफुगी कमी होते आणि पचनासाठी मदत होते, मसालेदार जेवणानंतरच्या पचनासाठी या सर्व घटकांचा उपयोग होतो.
