TRENDING:

Face Care : चेहऱ्यासाठी करा तुपाचा वापर, तुपात मिसळून लावा या गोष्टी, चेहरा दिसेल तजेलदार

Last Updated:

चेहऱ्यावर तूप लावल्यामुळे तुमच्या त्वचेला आर्द्रता आणि पोषण मिळते, ज्यामुळे ती मऊ, लवचिक आणि चमकदार दिसते.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : आपल्या आहारात तुपाचा समावेश असतो, तूप चेहऱ्यासाठीही पोषक आहे. साधं तूप लावण्याऐवजी
News18
News18
advertisement

त्यात तीन गोष्टी मिसळल्या तर ते त्वचेच्या आरोग्यासाठी ते अधिक फायदेशीर ठरु शकतं. चेहऱ्यावर तूप लावल्यामुळे तुमच्या त्वचेला आर्द्रता आणि पोषण मिळते, ज्यामुळे ती मऊ, लवचिक आणि चमकदार दिसते. यात चेहऱ्यासाठी आवश्यक फॅटी ऍसिडस् आणि जीवनसत्त्वं त्वचेची लवचिकता सुधारण्यासाठी उपयुक्त आहेत. यामुळे चेहऱ्यातला कोरडेपणाही कमी होतो.

तुपाचे नैसर्गिक गुणधर्म त्वचेचा रंग सुधारण्यास आणि डाग कमी करण्यास मदत करतात, ज्यामुळे तुम्हाला निरोगी त्वचा आणि चेहऱ्यावर चमक मिळते. पण साधं तूप लावण्याऐवजी त्यात ३ गोष्टी मिसळा, त्यामुळे तुमच्या त्वचेच्या आरोग्यासाठी ते अधिक फायदेशीर ठरु शकतं.

advertisement

B12 Deficiency : ही एक गोष्ट दूर करेल व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता, जाणून घ्या आहारात समावेश कसा करावा

तूप - मध मिसळून लावा -

चेहऱ्यावर मधासोबत तूप लावू शकता. कारण या दोन्हीमध्ये चेहऱ्याची आर्द्रता दीर्घकाळ ठेवण्याचे गुणधर्म आहेत, ज्यामुळे तुमच्या चेहऱ्याला पुरेसं हायड्रेशन मिळेल. यामुळे सुरकुत्या आणि बारीक रेषांची समस्या कमी होईल. फक्त हे दोन्ही मिक्स करुन 10 ते 15 मिनिटं चेहऱ्यावर लावा आणि नंतर कोमट पाण्यानं चेहरा स्वच्छ करा. यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होतील.

advertisement

Curry Leaves : कढीपत्ता आहे केसांसाठी वरदान, या गोष्टी मिसळून लावा पेस्ट, केस होतील लांबलचक

तूप - बेसन -

चेहऱ्यावर तूप आणि बेसनही लावू शकता. यामुळे चेहऱ्यावरचे डाग, मुरुम आणि सुरकुत्या कमी होण्यास मदत होते. तुम्हाला फक्त 1 चमचा बेसन घ्यायचं आहे, त्यात तूप मिसळा आणि 15 मिनिटं चेहऱ्यावर लावा. त्यानंतर चेहरा पाण्यानं स्वच्छ करा. हा उपाय तुम्ही आठवड्यातून 3 वेळा करून पाहू शकता.

advertisement

तूप - मुलतानी माती -

तूप आणि मुलतानी माती हे देखील प्रभावी उपाय आहेत. मुलतानी माती त्वचेला खोलवर साफ करून मुरुम काढून टाकण्यास मदत करते. यासाठी मुलतानी मातीचा फेस पॅक तयार करताना त्यात तूप मिसळा. 5 मिनिटं चेहऱ्यावर ठेवा आणि नंतर कोमट पाण्यानं चेहरा धुवा.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Face Care : चेहऱ्यासाठी करा तुपाचा वापर, तुपात मिसळून लावा या गोष्टी, चेहरा दिसेल तजेलदार
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल