advertisement

B12 Deficiency : ही एक गोष्ट दूर करेल व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता, जाणून घ्या आहारात समावेश कसा करावा

Last Updated:

B12मुळे तुमच्या शरीरातील चेतापेशी आणि रक्तपेशी निरोगी राहतात. व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेवर मात करण्यासाठी आहारात गुळाचा समावेश करू शकता. 

News18
News18
मुंबई : आपल्या निरोगी आयुष्यासाठी आवश्यक असलेल्या जीवनसत्त्वांपैकी महत्त्वाचं म्हणजे B12. व्हिटॅमिन बी 12 हे एक महत्त्वाचे पोषक तत्व आहे. यामुळे तुमच्या शरीरातील चेतापेशी आणि रक्तपेशी निरोगी राहतात. व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेमुळे किंवा फोलेटच्या कमतरतेमुळे अशक्तपणा जाणवू शकतो.
व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेच्या लक्षणांमध्ये थकवा, डोकेदुखी, नैराश्य, निस्तेज त्वचा, आणि तोंडात आणि जीभेमध्ये वेदना आणि सूज यांचा समावेश होतो. जर तुम्हालाही व्हिटॅमिन बी12 ची कमतरता जाणवत असेल तर तुम्ही तुमच्या आहारात काही गोष्टींचा समावेश करू शकता.
advertisement
व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेवर मात करण्यासाठी आहारात गुळाचा समावेश करू शकता. गूळ आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. हिवाळ्यात गुळाचं सेवन केल्यानं शरीराला अनेक फायदे मिळतात. कॅल्शियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम, पोटॅशियम, लोह, जस्त, तांबे, व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स, फॉलिक ॲसिड, लोह यासारखे गुणधर्म गुळात आढळतात. गुळात व्हिटॅमिन बी12 चांगल्या प्रमाणात असतं.
1. पाण्यासोबत गुळ खा -
advertisement
तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाण्यासोबत गुळ खाऊ शकता. यामुळे व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता दूर करण्यास मदत होते आणि पचन सुधारण्यास देखील मदत करते.
2. गुळाचा चहा -
जर तुम्हाला असा गूळ खायला आवडत नसेल तर तुम्ही सकाळी नेहमीच्या चहाऐवजी गुळाचा चहा घेऊ शकता.
advertisement
३. दुधासह गुळ -
दुधासोबतही गुळाचं सेवन करता येते. दूध आणि गूळ एकत्र सेवन केलं तर शरीराला अनेक फायदे मिळू शकतात.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
B12 Deficiency : ही एक गोष्ट दूर करेल व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता, जाणून घ्या आहारात समावेश कसा करावा
Next Article
advertisement
सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान; सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय, ज्याचा कोणी विचारच केला नव्हता
सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान, सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय...
  • सोनं विसरा, हा पर्याय पाहा

  • गुंतवणुकीचा सर्वात मोठा 'गेम' उघड

  • एका निर्णयाने तुमचं नशीब बदलू शकतं

View All
advertisement